राज्यपाल भगतसिंह कोशियारी कोरोनमुक्त!!; राजकीय टाइमिंग काय सांगतेय??


प्रतिनिधी

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आणि आता शरद पवार कार्ड ऍक्टिव्हेट झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह होशियारी कोरोनामुक्त झाले आहेत. राष्ट्रवादीची बैठक आटोपून शरद पवार मातोश्रीवर पोहोचत असताना राज्यपाल कोरोनामुक्त झाल्याची बातमी आली आहे हे राजकीय टायमिंग नेमके काय सांगते?? याचा “संदेश” काय हे लक्षात घेणे आवश्यक आहे. Governor Bhagat Singh Koshiyari corona free

शिवसेना नेते एकनाथ शिंदे शिवसेनेचे 40+ आमदार घेऊन महाराष्ट्राबाहेर गेले आहेत, त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. परिणामी ठाकरे सरकार कधीही कोसळणार आहे. अशा वेळी मागील 3 दिवस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोरोनाग्रस्त होते.त्यामुळे हे सरकार वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते शिंदेंचे बंड मोडून काढण्यासाठी घटनात्मक मुद्दे उपस्थित करत आहेत. मात्र अशा वेळी शुक्रवारी, राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह निघाली आहे. राज्यपाल आता शनिवारी, २५ जून रोजी सर्व सूत्रे हाती घेणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय अस्थिरतेत आता विधानभवनानंतर आता राजभवन राजकीय घडामोडींचे मुख्य केंद्र बनणार आहे.

राज्यपाल काय निर्णय घेणार?

राज्यपाल कोरोनाग्रस्त होते, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता कोण देणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याच्याच आधार घेत विधानभवनाच्या आधारे महाविकास आघाडी सरकारचे नेते हे एकनाथ शिंदे यांचा गट बेकायदेशीर असल्याचे सिद्ध करण्यासाठी घटनात्मक मुद्दे उपस्थित करत आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेते पदावरून हटवणे, तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाला अमान्य करणे असे निर्णय घेतले आहेत.

आता शनिवार, २५ जूनपासून राज्यपाल पुन्हा सक्रिय होणार आहे, त्यामुळे आता राज्यपाल राज्यातील अस्थिर राजकीय वातावरणात हस्तक्षेप करतील, अशा वेळी राज्यपाल स्वतःच्या अधिकारांचा वापर करून विधानसभा उपाध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करणार का??, शिंदे गटाला मान्यता देतात का??, शिंदे गट राज्यपालांसमोर बहुमताचा दावा करणार का, राज्यपाल ठाकरे सरकारला तातडीने विशेष अधिवेशन बोलावण्याचा आदेश देऊन बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देणार का अथवा राज्यात राजकीय परिस्थितीत कमालीची अस्थिर झाल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Governor Bhagat Singh Koshiyari corona free

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*