कंगना म्हणली की ,”देशाला १९४७ मध्ये मिळाले ते स्वातंत्र्य नव्हते, तर ती भीक होती. खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले”.Government should withdraw Padma award from Kangana Ranaut; Demand of Congress spokesperson Gaurav Vallabh
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कंगना राणावतने आक्षेपार्ह विधान केले. या कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याबाबत बोलताना कंगनाने वादग्रस्त विधानांची परंपरा कायम राखत नव्या वादाला तोंड फोडले. यावेळी कंगना म्हणली की ,”देशाला १९४७ मध्ये मिळाले ते स्वातंत्र्य नव्हते, तर ती भीक होती. खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले”.
कंगना राणावतला काही दिवसांपूर्वीच पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेसने केली. ‘अपात्र व्यक्तींना पद्मपुरस्कार दिल्याने असे होते. कंगनाने संपूर्ण देशवासीयांची माफी मागावी. सरकारने तिच्याकडून पद्मपुरस्कार परत घ्यावा’, अशी मागणीही गौरव वल्लभ यांनी केली.कंगनाचे विधान हा थेट देशद्रोह ठरतो, असही गौरव वल्लभ म्हणाले.
तसेच कंगना राणावतविरोधात कलम ५०४, ५०५ आणि १२४ अ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App