विशेष प्रतिनिधी
मुंबई : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी एमपीएससीच्या चाळणी परीक्षेची तारीख जाहीर केली. ती अवघ्या २ दिवसानंतर अर्थात १३ सप्टेंबर घेण्याचे ठरवून टाकले. इतक्या कमी वेळेत विद्यार्थी परीक्षेला कसे येणार? या मुद्द्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वडेट्टीवारांवर निशाणा साधला आहे. वडेट्टीवारांनी ‘महाज्योती’ संस्थेला ‘यड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे, अशा शेलक्या शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी वडेट्टीवारांचा समाचार घेतला आहे. gopichand padalkar targets vijay vadettiwar over MPSC exams issue
पडळकर म्हणाले, की अति सन्मानीय विजय वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींचा छळ करण्याचा जणू विडाच उचलला आहे. पण त्यांच्या वागणूकीमुळे एमपीएससी आणि युपीएससी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा कडलोट होतो आहे. त्यांनी काल कुठलीही पूर्वसूचना न देता १३ सप्टेंबरला अचानक युपीएससी चाळणी परीक्षेचे आयोजन करून टाकले आहे. आता दोन दिवसांत विद्यार्थी येणार कधी? परीक्षा देणार कधी? युपीएससीचे उमेदवार दिल्लीला तयारीसाठी गेलेले असतात. काहींची १० ऑक्टोबरला पूर्व परीक्षा आहे, तर काहींच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती आहेत, याकडे गोपीचंद पडळकरांनी लक्ष वेधले.
विजय वडेट्टीवार यांनी आपल्या गलथान कारभारामुळे ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी असणाऱ्या ‘महाज्योती’ संस्थेला ‘यड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे. मी या प्रस्थापितांच्या सरकारला इशारा देतो की, चाळणी परीक्षा तुम्ही विद्यार्थ्यांशा चर्चा करून पुर्ननियोजित केली नाहीतर आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App