पवारांनी येड पेरलं अन् खुळं उगवलं अशी ठाकरे सरकारची गत आहे. सगळे गावच करील तर सरकार काय करील. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला असताना, त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी त्यांच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा कशी सुचतेय असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. Gopichand Padalkar alleges on Corona free village competition
प्रतिनिधी
मुंबई : पवारांनी येड पेरलं अन् खुळं उगवलं अशी ठाकरे सरकारची गत आहे. सगळे गावच करील तर सरकार काय करील. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला असताना, त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी त्यांच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा कशी सुचतेय असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
पडळकर म्हणाले, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पूर्णपणे मोडला आहे. घरातील कित्येक कर्ती माणसं मृत्यूमुखी पडलीत. यांचे अश्रू पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचते आहे. सगळं गावच करील तर सरकार काय करील? हाच प्रश्न मला या कामचुकार मंत्र्यांबद्दल पडला आहे. नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्देशाने ही करोनामुक्तीची स्पर्धा आणली आहे. या योजनेच्या सर्व 22 निकषांमध्ये या वसुली सरकारला शून्य गुण आहेत. या बाप्याने हे 22 निकष ठरवताना कुठेही या पथकांना किंवा व्यवस्थापनेसाठी निधी कोण देणार? ही बाब सोयीस्करपणे अंधारात ठेवली आहे.
खरंतर या 50 लाखांच्या बक्षीसांबद्दलही मला साशंकता आहे असे सांगून पडळकर म्हणाले, ज्या पत्रकारांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला आहे, त्यांना जीआर काढून पन्नास लाखांची मदत करतो सांगणाऱ्यांनी एक रुपायचीही मदत केली नाही. पण कुटुंबियांना साधी भेटही दिली नाही. ही स्पर्धा म्हणजे अशाच यांच्याभूलथापांच्या मालिकेचा एक भाग आहे.
ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारने ही स्पर्धा आयोजित केली आहे. यानुसार चांगली कामगिरी करणाºया पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये आणि 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App