एसटी महामंडळातला सचिन वाझे कोण? विचारत गोपीचंद पडळकर कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी, पगारासाठी आक्रमक

प्रतिनिधी

सांगली – महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावर वातावरण तापवणारे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आता आक्रमकपणे एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी मैदानात उतरले असून, लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी त्यांनी बैठक आयोजित केली आहे.gopichand padalkar aggresive for ST workers salaries and other rights

येत्या २१ सप्टेंबरला झरे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथे या लढ्याची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, आपण तिथे जास्त संख्येने यावे, असे आवाहन पडळकर यांनी केले आहेमोठ्या विश्वासाने महाराष्ट्रातला प्रवासी आजही एसटीने प्रवास करतो.



पण आपल्या त्यागाने आणि सेवेने एसटी महामंडळला मोठे करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची वेळ यावी, याचा राग येतो. एकतर तुटपुंजा पगार त्याचाही वेळेवर पत्ता नाही. ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत. महामंडळाला आवश्यकता नसणाऱ्या गोष्टीसाठी हजारो कोटींचे टेंडर काढून खाजगी कंत्राटदारांची संपूर्ण देणी दिली जातात,

पण कर्मचाऱ्यांचे मूलभूत पगार दिले जात नाहीत. हे सर्व कुणाच्या टक्केवारीसाठी चालले आहे? परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातला सचिन वाझे कोण? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला आहे. आपला विडिओ पडळकरांनी ट्विट केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात ज्या युनियनने आवाज उठवायला पाहिजे तेच आज प्रस्थापितांच्या तालावर नाचत आहेत, अशी टीका पडळकर यांनी केली आहे. कुठल्याही दबावाला न जुमानता आपल्या हक्कासाठी लढा उभारा, मी तुमच्या पाठीशी खंबरीपणे उभा आहे. माझे राज्य सरकारकडे मागणे आहे की जे राज्य कर्मचाऱ्यांना तेच एसटी कामगारांना द्या, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचे पडळकर म्हणाले आहेत.

gopichand padalkar aggresive for ST workers salaries and other rights

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात