गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनकडून अंमलबजावणीही सुरू
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळापाठोपाठ आता चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशननेही आपल्या खासगी बसमध्ये तिकीट दरात महिलांना ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. काल झालेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या मालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. शिवाय हा निर्णय राज्यभरातील खासगी ट्रॅव्हल्स असोसिएशनही घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Good news for women 50 percent discount on ticket price from private travels too
एसटी महामंडळाने आपल्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यात आता खासगी बसमध्येही सवलत मिळाल्याने महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे.
आनंदाची गुढी : पारंपरिक शोभायात्रेने हिंदू मराठी नववर्षाचे नाशिकमध्ये भव्य स्वागत
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सन्मान योजनेची घोषणा केली होती. यात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. महिलांच्या सन्मानासाठी ही योजना जाहीर केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
राज्य परिवहन महामंडळच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सूट देण्याची घोषणा करताच राज्य सरकारवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. घोषणेच्या दिवसापासूनच हा निर्णय अमलात देखील आणला गेला. त्यामुळे एसटी बसेसमध्ये महिलांची गर्दी वाढल्याचे चित्र समाजमाध्यमावर दिसू लागले होते. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनामध्ये महिला प्रवाशांची संख्या रोडावली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App