सह्याद्री अतिथीगृहात पार पडली उद्योग विभागाची आढावा बैठक
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde उद्योग विभागाचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी कामगारांची थकीत देणी देण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले गेले.Eknath Shinde
तसेच कामगारांची देणी वर्षानुवर्ष थकीत ठेवून आजारी किंवा बंद अवस्थेतील उद्योग आणि कारखाने हे एमआयडीसीच्या जागांवरील आपली मालमत्ता विकून टाकतात. त्यामुळे कामगारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. या कामगारांची थकीत देणी प्राधान्याने देण्याची बाब त्वरित एनसीएलटी म्हणजे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरणाच्या निदर्शनास आणून द्यावी आणि आजारी उद्योगांवर लक्ष ठेवून त्यांचा डेटा अद्यावत करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करावा असे निर्देश यासमयी दिले.
समाजातील विविध घटकांसाठी आपण आरोग्य तपासणी मोहीम आणि शिबिरे राबवली जातात. त्याच धर्तीवर आता एमआयडीसीमार्फत आरोग्य विभागाच्या मदतीने औद्योगिक क्षेत्रातल्या सर्व कामगारांसाठी व्यापक प्रमाणात आरोग्य शिबिरं आयोजित करून त्यांची व्यवस्थित वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे निर्देशही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच छोट्या उद्योगतील कामगारांच्या तपासणीला विशेष महत्त्व द्यावे असेही निर्देश याप्रसंगी दिले.
तसेच राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याची ओळख असलेले एक तरी आगळे वेगळे उत्पादन आहे. एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाला गती देण्यासाठी त्या जिल्ह्यात त्या उत्पादकांचे क्लस्टर करावे. त्या उत्पादनांसाठी संशोधन आणि विकास (आरएनडी) केंद्र सुरू करावी तसेच त्याला कौशल्य विकासाची जोड द्यावी जेणेकरून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल असेही यावेळी सुचवले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App