प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात अजितदादांच्या बंडाची आणि देशात विरोधी ऐक्याची चर्चा सुरू असताना आज सकाळी अचानक 10 वाजून 10 मिनिटांनी उद्योगपती गौतम अदानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी पवारांशी दोन तास बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेमध्ये स्वतः पवार आणि अदानी यांच्याशिवाय तिसरे कोणीही नव्हते, अशा बातम्या मराठी माध्यमांना दिल्या आहेत. अर्थातच या चर्चेतले कुठलेच तपशील बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे पवार – अदानी चर्चेविषयी अंदाजपंचे दहोदर्से असेच अंदाज लावले जात आहेत. Gautam adani – sharad Pawar closed door meeting at silver oak
पवार – अदानी भेट पूर्व नियोजित होती. त्यानुसार ही भेट झाली असल्याचा दावाही मराठी माध्यमांनी बातम्यांमधून केला आहे.
Sharad Pawar : आयुष्यभर आगीच लावल्या, शरद पवारांचे आडनाव बदलून आगलावे करा; सदाभाऊ खोत यांचे शरसंधान!!
त्यामुळे अर्थातच आधी अजित दादांचे बंड आणि आता थेट गौतम अदानी – शरद पवार सिल्वर ओक वर बंद चर्चा यामुळे पवारांच्या राजकीय खेळी विषयी विरोधकांच्या वर्तुळात संशय गडद झाला आहे.
पवार – अदानी चर्चेमध्ये राहुल गांधींनी अदानींवर केलेला 20000 रुपयांच्या गुंतवणुकीचा मुद्दा आला होता का??, अजितदादांच्या कथित बंडाचा मुद्दा आला होता का??, की खासदार सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भवितव्याचा वेगळाच मुद्दा चर्चिला गेला??, अशा शंका तयार झाल्या आहेत.
पण पवार – अदानी या दोघांच्याही चर्चेत यापैकी कोणताही मुद्दा आला असो अथवा नसो, त्याचे तपशील नंतर कदाचित बाहेर येतील किंवा येणार नाहीत, पण जेव्हा राहुल गांधी आणि काँग्रेसने संपूर्ण ताकदीनिशी अदानी मुद्दा देशभर पेटविला असताना पवारांनी एनडीटीव्हीला मुलाखत देऊन अदानींची बाजू उचलून धरणे, नंतर अजितदादांचे बंड होणे आणि आज सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेणे, यातून शरद पवारांच्या राजकीय भूमिकेविषयी विरोधी पक्षांच्या गोटामध्ये पूर्ण संशयाचे वातावरण तयार झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App