कोकणात माहेरवाशीण गौरीचा ओवसा कसा भारतात? काय आहे ही परंपरा


विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे मराठी लोकं आहेत. तिथे सगळीकडेच आता सध्या गणेशोत्सवाची लगबग बघायला मिळते. आपल्या सर्वांच्या लाडका बाप्पाचा गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आणि मंडळांमध्ये बाप्पाच्या आगमनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. मखर सजली प्रसादाची तयारी झाली आहे. Gauri Ganpati festival news

कोणाच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो तर कोणाकडे दहा दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जातो. आणि गणेशोत्सवाचाच अविभाज्य भाग म्हणजे गौरी. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये गौरी महालक्ष्मी हा सण साजरा करायची वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत.

मराठवाड्यामध्ये गौरीलाच महालक्ष्मी म्हटलं जातं. सोन्याच्या पावलाने ज्येष्ठा कनिष्ठ आल्या असं म्हणत महालक्ष्मीची स्थापना केली जाते. तर कोकणातला गौरी गणपतीचा उत्सव हा वेगळा असतो. गणपती बाप्पा सोबत येणाऱ्या या गौरीची स्वागताची परंपरा ही वेगळी आहे. घरोघरी या माहेरवाशिणीचे वेगवेगळ्या रुपात स्वागत करत पाहुणचार केला जातो. यामुळे या सणाला गौरी गणपतीचा सण असेही म्हटले जाते आणि महाराष्ट्रात तो भक्तीभावाने, उत्साहात साजरा केला जातो. या गौराईच्या स्वागतावेळी कोकणात नववधूने ओवसा भरण्याची परंपरा साजरी केली जाते.

गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी गौराईची स्थापना केली जाते. गौराईच्या सणाचे विशेष म्हणजे, महाराष्ट्रात वेशीवेशीवर या माहेरवाशिणीच्या पूजेची पद्धत, नैवेद्याची पद्धत बदलते. वाजत, गाजत, नवी साडी- चोळी आणि दागिन्यांनी मढवून गौराईला घरी आणले जाते. या गौराईची स्थापना, तयारी माहेरवाशिणीच्या हातून केली जाते. कोकणात गौरी पूजनाच्या दिवशी गौरीचा ओवसा भरण्याची पद्धत साजरी केली जाते.

Gauri Ganpati festival news

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात