विधानसभेसाठी महायुतीचा मेळावा; अजित पवार म्हणाले- पराभवाचे चिंतन गरजेचे


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभेनंतर आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. यावेळीलोकहिताचे निर्णय मार्गी लावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीने सहकार्याने केला. लोकहिताला प्राधान्य देण्यात आलं. शाश्वत विकासाचे काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरीही राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही, असे अजितदादा म्हणाले. त्यांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्याबदद्ल अभिनंदन केले.Gathering of the Grand Alliance for the Legislative Assembly; Ajit Pawar said – Contemplation of defeat is necessary



लोकसभेतील पराभवाचे खापर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर फोडले होते. त्यांनी संविधान आणि इतर गोष्टींचा गैरसमज पसरवल्याने महायुतीचा पराभव झाल्याचे बोलले जात होते. पण अजितदादांनी महायुतीला पण आत्मचिंतन करायला लावले. त्यांनी महायुतीचा पराभव कशामुळे झाला, याचे झणझणीत अंजनच महायुतीच्या डोळ्यात घातले.

विभागनिहाय, जिल्हानिहाय, तालुकानिहाय समन्वय साधण्याचे ठरवलं होतं पण ते झालं नाही. महायुतीत समन्वय राखण्यात अपयश आल्याची अजित पवारांची जाहीर कबुली अजितदादांनी या मेळाव्यात बोलताना दिली. विरोधकांनी पसरविलेला गैरसमज हाणून पाडण्याचं काम आपण केलं पाहिजे. आता समन्वय राखण्यासाठी लगेच कामाला लागू, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

Gathering of the Grand Alliance for the Legislative Assembly; Ajit Pawar said – Contemplation of defeat is necessary

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात