विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ असा राजकीय संघर्ष रंगत असताना त्याचा मोठा लाभ काँग्रेसला होताना दिसत आहे. काँग्रेसने या संघर्षाचा फायदा उठविण्यासाठी आधीच पावले उचलली आहेत आणि मतदारांनी देखील त्याला अनुकूल प्रतिसाद करून दिला आहे. कारण महाराष्ट्रात पहिल्या नंबरच्या भाजपशी टक्कर घेताना काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाल्याचे सकाळ साम सर्वेक्षणाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. Gains for Congress in Sharadnisht vs Ajitish NCP struggle
शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर शिवसेना दुसऱ्या क्रमांकावरून घसरून पाचव्या क्रमांकावर गेली आहे, तर राष्ट्रवादीत देखील आता शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ या संघर्षात मूळ पक्षाची घसरण झाली आहे आणि काँग्रेसने या दोन्ही पक्षांवर मात करत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
भाजपला 26.8% मतदारांनी कौल देतानाच काँग्रेसला 19.9% मतदारांनी कौल दिला आहे. याचा अर्थ राष्ट्रवादीतल्या संघर्षाचा लाभ थेट काँग्रेसला झाला आहे आणि काँग्रेसने त्या दृष्टीने पावले देखील उचलली आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर जाण्याची तयारी करून 21 जागा निवडून आणण्याचे टार्गेट ठेवले आहे. त्या दृष्टीने संघटनेची पुनर्बांधणी सुरू केली आहे. सकाळच्या सर्वेक्षणात मतदारांनी देखील काँग्रेसला अनुकूल प्रतिसाद दिला आहे.
पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर; प्रमुख पाहुणे शरद पवार, NCPच्या फुटीनंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच एका व्यासपीठावर
लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 मतदारसंघातील 73330 मतदारांच्या सर्वेक्षणात भाजपने अव्वल स्थान पटकावले आहे.
वर उल्लेख केलेल्या टक्केवारीनुसार मतदारांनी प्रत्यक्ष निवडणुकीत कौल दिला, तर भाजप महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणेल, त्याचवेळी शरद पवारांच्या प्रभावाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पिछाडीवर ढकलत मूळ काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर झेप घेईल, असे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App