विशेष प्रतिनिधी
मुंबई : सरकारच्या विविध योजनांचा लाभ राज्यभरातील समस्त नागरिकांना मिळावा, या उद्देशाने शिंदे-फडणवीस सरकारने ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची’ हा उपक्रम हाती घेतला आहे. आजपासून(१५ एप्रिल) राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये १५ जून २०२३ पर्यंत हा उपक्रम राबवविला जाणार आहे. From today the fair of government schemes is starting across the state
जनतेला शासकीय योजनांची माहिती, अर्ज केल्यावर लाभ कसा मिळतो, अर्ज कुठे, कसा करावा. कागदपत्रे काय जोडावीतयाची माहिती नसते. यामुळे काहीजण शासकीय योजनांपासून वंचित राहतात. याचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत.
या उपक्रमाद्वारे प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी किमान ७५ हजार लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. या उपक्रमांतर्गत शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी आणि विविध दस्ताऐवज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय विविध कार्यालयांमधील कर्मचारी एकत्र येऊन नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळवून देणार आहेत.
‘’गतिमान निर्णयाला आता वेगवान अंमलबजावणीची जोड. प्रत्येक जिल्ह्यात ‘शासकीय योजनांची जत्रा’ होणार. किमान ७५ हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार.’’ अशी ट्वीटद्वार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाची माहिती दिली आहे.
गतिमान निर्णयाला आता वेगवान अंमलबजावणीची जोड…प्रत्येक जिल्ह्यात 'शासकीय योजनांची जत्रा' होणार… किमान ७५ हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार…#शासकीय_योजनांची_जत्रा #महासंकल्प pic.twitter.com/o9hIHCjPYM — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2023
गतिमान निर्णयाला आता वेगवान अंमलबजावणीची जोड…प्रत्येक जिल्ह्यात 'शासकीय योजनांची जत्रा' होणार… किमान ७५ हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार…#शासकीय_योजनांची_जत्रा #महासंकल्प pic.twitter.com/o9hIHCjPYM
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2023
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. या उपक्रमात एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत देण्यात येणार आहे. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद साधत हा उपक्रम अभियानस्तरावर राबवून अद्याप शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या लाभार्थीना लाभ मिळवून देण्याचे आदेश दिलेले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App