हिंदू दहशतवाद ते श्रीमद्भगवद्गीतेत जिहाद; काँग्रेसी घसरत्या मानसिकतेचा उन्माद


विशेष प्रतिनिधी

मुंबई : हिंदू दहशतवाद ते श्रीमद् भगवद्गीतेत जिहाद हा गेल्या 10 वर्षांचा घसरता काँग्रेसी उन्माद आहे… बरोबर 10 वर्षांपूर्वी 2012 मध्ये काँग्रेसी केंद्रीय गृहमंत्र्यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द संसदेत पेरला होता. तिथपासून सुरू झालेला काँग्रेसी घसरता प्रवास आता श्रीमद्भगवद्गीतेत जिहाद शोधण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. From saffron hindu terror to jihad in Bhagwatgeeta; imminent downfall of Congress

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी नवी दिल्लीत माजी केंद्रीय मंत्री मोहसीना किडवई यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात, भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत अर्जुनाला जिहादच शिकवला होता, असा जावई शोध लावला आहे. हा शोध लावताना जिहाद ही संकल्पना फक्त कुराण अथवा बायबल मध्येच शोधायचे कारण नाही ही संकल्पना श्रीमद्भगवद्गीते देखील आहे असे शिवराज पाटील म्हणाले आहेत.

शिवराज पाटलांच्या या वक्तव्यावरून अर्थातच देशात राजकीय क्षोभ उसळला आहे. शिवराज पाटलांचे डोके फिरले आहे, अशा प्रतिक्रिया भाजप सह काही पक्षांनी व्यक्त करून त्यांचा निषेध जरूर केला आहे, पण शिवराज पाटलांच्या वक्तव्याचे पडसाद सोशल मीडिया जोरदार उमटले आहेत.



 

श्रीमद्भगवद्गीते सारख्या आध्यात्मिक ग्रंथात जिहाद शोधणारे शिवराज पाटील हे काही एकमेव काँग्रेस नेते नव्हेत. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री राहिलेल्याच सुशीलकुमार शिंदे यांनी 2012 मध्ये हिंदू दहशतवाद या संकल्पनेचा संसदेत उच्चार केला होता. इतकेच नव्हे तर 2006 च्या मालेगाव बॉम्बस्फोटांपासून काँग्रेस दहशतवादाची पाळेमुळे ही मुस्लिम सोडून इतरत्र कशी रुजली आहेत हे दाखवण्यासाठी आटापिटा करत होती आणि त्या अट्यापिट्यातूनच हिंदू दहशतवाद या शब्दाचा उगम झाला आणि तो सुशील कुमार शिंदे यांनी 2012 मध्ये संसदेत उच्चारला. त्यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले अधिकारी आर. व्ही. एस. मणी यांनी एक ग्रंथ लिहून हिंदू दहशतवाद या शब्दामागे असणारी काँग्रेस ही मानसिकता पूर्णपणे एक्सपोज केली होती. त्यानंतर सुशील कुमार शिंदे यांनी आपण हिंदू दहशतवाला शब्द वापरलाच नसल्याचा दावा केला होता.

अर्थातच त्याचा राजकीय फटका काँग्रेसला सहन करावा लागला. 2014 – 2019 हा राजकीय प्रवास काँग्रेससाठी प्रचंड घसरणीचा ठरला. त्यामागे देशातल्या बहुसंख्यांक समाजाला दहशतवादी ठरवण्याचा आटापिटाच कारणीभूत ठरला.

आता त्या पलिकडे जाऊन हिंदूंचा पवित्र मानला गेलेला धर्मग्रंथ भगवद्गीतेलाच जिहादी वाङ्मय ठरवण्याचे औधत्य शिवराज पाटील यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने केले आहे. 2012 मध्ये संसदेत उच्चारलेला हिंदू दहशतवाद या संकल्पनेने काँग्रेसची अवस्था काय करून ठेवली आहे ही दिसतेच आहे. आता जेव्हा राहुल गांधी यांच्यासारखे वरिष्ठ नेते भारत जोडो यात्रा काढत आहेत, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने काँग्रेसने नवा अध्यक्ष निवडला आहे, त्यावेळी शिवराज पाटील यांनी श्रीमद्भागवत गीतेत जिहादचा जावई शोध लावून नेमके काय साध्य केले आहे?? त्याचा परिणाम काय होणार आहे??, हे सांगायला फार मोठ्या राजकीय ज्योतिषाची गरज नाही!!

From saffron hindu terror to jihad in Bhagwatgeeta; imminent downfall of Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात