फ्रॅक्चर्ड फ्रीडम अनुवाद पुरस्कार मागे वाद; साहित्य संस्कृती मंडळाच्या दोन सदस्यांचे राजीनामे; अध्यक्ष सदानंद मोरेंचा राजीनाम्यास नकार


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोबाड गांधी लिखित आणि अनघा लेले अनुवादित फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाच्या पुस्तकाला जाहीर केलेला शासकीय पुरस्कार शासनानेच मागे घेतला. याच्या निषेधार्थ साहित्य संस्कृती मंडळाच्या प्रज्ञा दया पवार आणि नीरजा या दोन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.

27 मे 2021 रोजी पुनर्रचना झालेल्या मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी या प्रकरणात राजीनामा द्यायला नकार दिला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. आपण साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष या नात्याने सरकारचा एक जबाबदार घटक असून सरकारच्या निर्णयाविरुद्ध आपण बोलणार नाही. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार नाही. साहित्य संस्कृती मंडळाने शिफारस केलेल्या पुस्तकांना पुरस्कार नाकारण्याचा सरकारला पूर्ण अधिकार आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

साहित्य संस्कृती मंडळाच्या वेबसाईटवर या मंडळाची रचना दिली आहे. त्यामध्ये 27 मे 2021 रोजी पुनर्रचित साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्यांची यादी दिली आहे. या पैकी डॉ. रामचंद्र देखणे आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन झाले आहे. 2 सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. 14 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत बाकीचे सदस्य साहित्य संस्कृती मंडळात कायम आहेत.



साहित्य संस्कृती मंडळाची रचना अशी :

डॉ. सदानंद मोरे अध्यक्ष
डॉ.प्रज्ञा दया पवार सदस्य
श्री.अरुण शेवते सदस्य
डॉ.रणधीर शिंदे सदस्य
श्रीमती नीरजा सदस्य
श्री.प्रेमानंद गज्वी सदस्य
डॉ.नागनाथ कोतापल्ले सदस्य
श्री.प्रविण बांदेकर सदस्य
श्रीमती मोनिका गजेंद्रगडकर सदस्य
श्री.भारत सासणे सदस्य
श्री.फ.मु.शिंदे सदस्य
डॉ.रामचंद्र देखणे सदस्य
डॉ.रवींद्र शोभणे सदस्य
श्री.योगेंद्र ठाकूर सदस्य
श्री.प्रसाद कुलकर्णी सदस्य
श्री.प्रकाश खांडगे सदस्य
प्रा.एल.बी.पाटील सदस्य
श्री.पुष्पराज गावंडे सदस्य
श्री.विलास सिंदगीकर सदस्य
प्रा.प्रदीप पाटील सदस्य
डॉ.आनंद पाटील सदस्य
प्रा.शामराव पाटील सदस्य
श्री.दिनेश औटी सदस्य
श्री.धनंजय गुडसुरकर सदस्य
श्री.नवनाथ गोरे सदस्य
श्री.रवींद्र बेडकीहाळ सदस्य
प्रा.रंगनाथ पठारे सदस्य
श्री.उत्तम कांबळे सदस्य
श्री.विनोद शिरसाठ सदस्य
डॉ.संतोष खेडलेकर सदस्य

Fractured freedom translation award rejected; sahitya sanskriti mandal chairman sadanand more refused to resign

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात