इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाल्यामुळे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते ऋग्वेदाचा सत्कार करण्यात आला. Four-year Rig Veda record; Recorded in the International Book of Records
विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील ऋग्वेदाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाली आहे.ऋग्वेदा सागर विरकर ही अवघ्या ४ वर्षांची मुलगी आहे. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झाल्यामुळे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते ऋग्वेदाचा सत्कार करण्यात आला.
ऋग्वेद मानवी शरीर रचना, विज्ञान, यामध्ये सांगाडा प्रणाली, मानवी शरीरातील हाडांची नावे, पचनसंस्था व त्यांच्या ग्रंथी उत्सर्जन संस्था, श्वसन प्रणाली, मज्जासंस्था आणि मानवी दातांचे प्रकार सांगून अनोखा विक्रम प्रस्थापित केला.ऋग्वेदा एक मिनिटे २१ सेकंदात अनेक देशांची नावे आणि त्यांच्या राजधान्यांची अचूक माहिती सांगते तसेच अवघ्या ४ मिनिटे आणि ५६ सेकंदात भारतातील राज्य व केंद्रशासीत प्रदेश यांची नावे व राजधान्यांची माहिती सांगते.
ऋग्वेदाने तीन स्पर्धेत प्राविण्य मिळवून १२ करंडक १८ पदके आणि ४१ प्रशस्तीपत्रके मिळविली आहेत. ऋग्वेदाच्या अनोख्या विक्रमाचा कार्यक्रम ‘युनिक गर्ल ऑफ इंडीया’ या युट्यूब चॅनलला लाखो फॉलोअर्स आहेत. ऋग्वेदाच्या पालकांनी ऋग्वेदाला भविष्यात अंतराळवीर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App