प्रतिनिधी
वर्धा : शरद पवारांनी अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध येवल्यातून दंड थोपटले असले तरी शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस मधून गळती थांबायला तयार नाही. काल सातारा जिल्ह्यातल्या आमदार मकरंद पाटील यांनी अजित निष्ठा राष्ट्रवादी काँग्रेसची कास धरली तर आज माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन अजितनिष्ठ राष्ट्रवादी प्रवेश करत असल्याचे जाहीर केले.Former Union Minister Subodh Mohite was waiting for Ajitish NCP
शरद पवारांनी अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काल छगन भुजबळांच्या येवल्यात दंड थोपटले. तेथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मदतीने शक्ती प्रदर्शन केले. पण पक्षातली गळती रोखण्यास मात्र त्यांना अपयश आले. आमदारांची संख्या माझ्या दृष्टीने महत्त्वाची नाही, असे सांगून शरद पवारांनी आधीच होणारी गळती कबूलही करून टाकली.
या पार्श्वभूमीवर आज जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी देखील आपल्या निष्ठावंतांचा मेळावा नारायणगाव मध्ये बोलावला आहे. तेथे ते निष्ठावंतांकडून मते जाणून घेऊन अजितनिष्ठ राष्ट्रवादीत जाणार आहेत. राष्ट्रवादीचे अनेक आमदाराचा आपापल्या मतदारसंघांमध्ये मिळावे घेऊन समर्थकांच्या शिक्कामोर्तबासह अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे हात बळकट करणार आहेत.
सुबोध मोहिते यांच्यासारखा माजी केंद्रीय मंत्री अजित पवारांच्या बाजूला आल्याने विदर्भात अजित निष्ठा राष्ट्रवादीत ताकदीची धुगधुगी येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App