‘’सत्तेवर असताना मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या…’’ असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना(ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात फूट पडल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिमला भेट देणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या विदर्भ दौऱ्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. BJP state president Chandrasekhar Bawankules criticism of Uddhav Thackerays visit to Vidarbha
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘’सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही, ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय.’’
याशिवाय ‘’सत्तेवर असताना मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरांत दर्शनासाठी जावं लागतंय. उद्धव ठाकरे आता तुम्ही कितीही दौरे केले तरी तुमचं ढोंगी राजकारण आणि सत्ता गेल्यामुळे सुरू असलेली नौटंकी जनता ओळखून आहे.’’ असंही बावनकुळेंनी म्हटले आहे.
सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय. सत्तेवर असताना… — Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) July 9, 2023
सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय.
सत्तेवर असताना…
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) July 9, 2023
याचबरोबर, ‘’उद्धव ठाकरे तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर आलाच आहात तर भाजपसोबत गद्दारी करून, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडून तुम्हाला काय मिळालं हेही एकदा जनतेला सांगून टाका.’’ अशा शब्दांमध्ये बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App