परिचित असलेल्या अनेकांना ‘गूड बाय’ असा टेक्स्ट मेसेज केला होता
प्रतिनिधी
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चंद्रशेखर पाटील चाकूरकर (वय-८१) हे शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत बंधू आहेत. लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागत ते राहत होते.Former Union Minister Shivraj Patil Chakurkar’s brother committed suicide by shooting himself!
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी परिचित असलेल्या अनेकांना ‘गूड बाय’ असा टेक्स्ट मेसेज केला होता. तर काही वेळाने व्हॉट्सअँपवर देखील त्यांनी ‘गूड बाय’ स्टेटस ठेवला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा करण्यात येत आहे. तर चंद्रशेखर चाकूरकर यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App