विशेष प्रतिनिधी
मुंबई : शंभर कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात चालला आहे. त्यांचा मुलगा हृषिकेश देशमुख हा देखील आर्थिक गैरव्यवहारात सक्रीय होता असे प्रतिज्ञापत्र सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयात दिले आहे.Former Home Minister Anil Deshmukh’s son will also get involved, ED’s affidavit that he is active in financial malpractice
ईडीने हृषिकेश यांच्या अटकपूर्व जामीन अजार्ला विरोध करताना विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की हृषिकेश देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सक्रिय होते. बेकायदेशीररित्या मिळालेले पैसे देणगी स्वरुपात दाखवण्यासाठी हृषिकेश यांनी त्यांच्या वडिलांना मदत केली. न्यायालयाने देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी ४ डिसेंबर रोजी ठेवली आहे.
हृषिकेश देशमुख यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला तर ते पुराव्यांची छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांचे ११ कंपन्यांवर नियंत्रण असल्याचे प्राथमिक तपासातून उघडकीस आले आहे. त्यातील बहुसंख्य कंपन्यांत हृषिकेश हे संचालक किंवा भागधारक आहेत.
हृषिकेश यांच्या वडिलांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेद्वारे बार व रेस्टॉरंट्सकडून वसुली केलेल्या ४.७० कोटी रुपयांतील काही पैसे हवालाद्वारे त्यांच्या सहकाºयाकडे वळते केले आणि तेच पैसे ट्रस्टला देण्यात आलेली देणगी म्हणून दाखविण्यात आले, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
हृषिकेश देशमुख यांनी कुटुंबीयांबरोबर मिळून कॉम्प्लेक्स वेब ही कंपनी स्थापन केली होती. याच कंपनीच्या खात्यावरून संशयित व्यवहार करण्यात आला आहे. सहा वेळा समन्स बजावूनही हृषिकेश तपासाला सहकार्य करत नाहीत, असेही ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. हृषिकेश यांनी ईडी चुकीच्या हेतूने कारवाई करत असल्याचे जामीन अर्जात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App