विशेष प्रतिनिधी
सोलापूर : केंद्राच्या मिनिस्टर ऑफ एज्युकेशन या विभागात क्लास वन ऑफीसर म्हणून काम पाहिलेले ज्येष्ठ साहित्यिक एम. जी. भगत यांच्यावर पंढरपूर येथे भिक मागण्याची वेळ आली. एक महिन्यापूर्वी ते दिल्लीतील निवासस्थानाहून गायब झाले होते. रेल्वेमध्ये त्यांच्याजवळच्या सर्व वस्तू हरविल्यानंतर गंभीर आजारी अवस्थेत त्यांच्यावर ही वेळ आली.Former Class One officer was found begging in Pandharpur
एम. जी. भगत असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. एम. जी. भगत यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी सात पु्स्तके ही केंद्रीय अभ्यासक्रमात आहेत. याशिवाय त्यांनी अनेक वृ्त्तपत्रांमध्ये लेखन केलं आहे. मात्र ते पंढरपुरात अत्यंत वाईट आणि दयनीय अवस्थेत आढळले होते. त्यांच्या पायाला जखमा झालेल्या होत्या. त्यांचे कपडे मळलेले होते.
याशिवाय ते रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांकडे भीक मागत होते. त्यांची अवस्था पाहून कुणीही त्यांना ओळखू शकत नव्हते. ते इंग्रजी भाषेत लोकांकडे मदतीसाठी विनंती करत होते. त्यामुळे अनेकजण आश्चर्यचकीत झाले. या दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती मिळाली. ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी भगत यांच्यासोबत संभाषण केले.
एम. जे. भगत यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना आपल्यासोबत नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मी वध्यार्चा रहिवासी आहे. पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी रेल्वेने निघालो होतो. प्रवासावेळी मोबाईल, सामान आणि पैसे गायब झाले, काही कळले नाही. माझ्या हातापायाला दुखापत झाली आहे.
मला हालचाल करता येत नाहीय. तीन दिवस मी रेल्वे स्टेशन बाहेरील रस्त्यावर पडून आहे. माझी शुद्धी हरपते. लोक मला भिकारी समजून अन्न, पाणी देतात. मात्र, त्यांना काही सांगण्याइतके त्राणही माझ्यात नाही.
सामाजिक कार्यकर्त्यांनी भगत यांच्या कुटुंबियांचा शोध सुरु केला. त्यानंतर भगत यांच्या दिल्लीतील नातेवाईकांशी त्यांचा संपर्क झाला. ते त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानातून गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता आहेत. ते मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याची देखील माहिती कार्यकर्त्यांना मिळाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App