माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल : राज्यात भाजपने ईडी-पैशांच्या जोरावर सत्ताबदल केला, काँग्रेस देशभरात करणार जोरदार विरोध


प्रतिनिधी

पुणे/मुंबई : नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून गुरुवारी चौकशी करण्यात आली. याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यातही ठिकठिकाणी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नेतेदेखील रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईत आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.Former Chief Minister Prithviraj Chavan’s attack BJP changed power in the state with the help of ED-money, Congress will protest strongly across the country

राज्यात भाजपने ईडी आणि पैशांच्या जोरावर सत्ता बदल केला आहे. एकनाथ शिंदे गटाने पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले असून ज्या आमदारांनी बंडखोरी केली ते सत्तेतून पायउतार होतील. न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत जैसे थे स्थिती ठेवण्याचा निर्णय दिला असून त्याचे पालन सत्ताधाऱ्यांना करावे लागणार आहे. देशात गुंडगिरी, दहशत सुरू असून काँग्रेस नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केले.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून गुरुवारी चौकशी करण्यात आल्याने पुण्यात काँग्रेसने आंदोलन केले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री सतीश पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, माजी मंत्री रमेश बागवे, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, संगीता तिवारी, गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, अभय छाजेड, कमल व्यवहारे, आबा बागूल उपस्थित होते.

मुंबईत पटोलेंनी केले आंदोलनाचे नेतृत्व

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की, स्त्रियांचा आदर केला जातो तिथेच देवाचा वास असतो. मात्र, आता सत्तेत असलेले लोक स्त्रियांचा अवमान तर करत आहेतच, त्यासोबतच स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांनाही ते प्रोत्साहन देत आहेत. अशा स्थितीत सत्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.’

Former Chief Minister Prithviraj Chavan’s attack BJP changed power in the state with the help of ED-money, Congress will protest strongly across the country

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात