माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण, ट्वीट करून दिली माहिती, होम क्वारंटाइन

 

प्रतिनिधी

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्हि आली आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे उपचार आणि औषधपाणी सुरु आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केले आहे.

राज्यसभा निवडणुकीला उपस्थित राहण्यावरून संभ्रम

एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली की, त्यांना 7 दिवस विलगीकरणात म्हणजेच क्वारंटाइनमध्ये राहावे लागते. परंत राज्यसभा निवडणुकीचे मतदान 10 जूनला होत आहे. यामुळे या निवडणुकीला फडणवीसांच्या उपस्थितीवरून साशंकता निर्माण झाली आहे. शुक्रवारीच फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे या नेत्यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मविआच्या शिष्टमंडळात छगन भुजबळ, अनिल देसाईंसह बड्या नेत्यांचा समावेश होता.

राज्यातील कोरोना रुग्णांत लक्षणीय वाढ

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबाबत राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडे चिंता व्यक्त केली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकार्‍यांना पत्र लिहून सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्यासह अनेक आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, ट्रेन, बस, सिनेमा हॉल, सभागृह, ऑफिस, हॉस्पिटल, कॉलेज, शाळा अशा बंद सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य आहे.

डॉ. व्यास म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे जनतेला मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आपल्या पत्रात व्यास यांनी लिहिले आहे की, गेल्या काही महिन्यांत राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असताना आता रुग्णांची संख्या हळूहळू पण सातत्याने वाढत आहे. तीन महिन्यांनंतर दैनंदिन प्रकरणांनी प्रथमच 1 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबई महानगर प्रदेश आणि ठाणे येथे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे, परंतु इतर जिल्ह्यांमध्ये सकारात्मकतेचे प्रमाण वाढत असल्याने, इतर जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे.

9 जिल्ह्यांनी चिंता वाढवली

व्यास म्हणाले की, गेल्या आठवड्याच्या तुलनेत नऊ जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. हे पाहता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. डॉ व्यास म्हणाले की, राज्य हातावर हात ठेवून बसू शकत नाही, सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अलीकडे BA.4 आणि BA.5 चे उप प्रकार असलेले रुग्ण आढळले आहेत.

Former Chief Minister Devendra Fadnavis infected with coronavirus, tweeted information, home quarantine

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात