नाशिक : मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये जी प्रभाग रचना निर्माण करून ठेवली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा प्रादेशिक पक्षांची पुरती राजकीय गोची होऊन बसली आहे. कारण एकेका प्रभागात चार सक्षम उमेदवार आणायचे कुठून??, या सवालाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना आणि मनसे यांच्यासारखे सगळे छोटे पक्ष आणि त्यांचे नेते हैराण झालेत.Forced alliance between Pawar uncle and nephews; Both nationalists are exhausted while fielding four capable candidates in each ward!!
– मुंबई सोडून इतरत्र गोची
मुंबईत 227 वॉर्ड आहेत. त्यामुळे तिथे प्रत्येक वॉर्डतून एकच उमेदवार निवडायचा आहे. त्या उलट पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, ठाणे, नवी मुंबई आदी महापालिकांमध्ये चार आणि तीन च्या प्रभागांमधून नगरसेवक निवडायचे आहेत. म्हणजे प्रत्येक नागरिकाला एकेका प्रभागात किमान तीन ते चार मते द्यावी लागणार आहेत. याचा अर्थ प्रत्येक प्रभागात प्रत्येक पक्षाला तीन ते चार उमेदवारांचे पॅनल पूर्ण करून उभे करायचे आहे. इथेच नेमकी छोट्या पक्षांची गोची झाली आहे. त्यांच्याकडे एकेका प्रभागात उभे राहू शकणारे तीन किंवा चार सक्षम उमेदवारच नाहीत. दोन्ही राष्ट्रवादींना प्रत्येक प्रभागात एक – दोन सक्षम उमेदवार मिळालेत, पण तिसरा किंवा चौथा सक्षम उमेदवार शोधताना दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची दमछाक होऊन बसली आहे. त्यांना तिथे निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवारच मिळाले नाहीत.
– भाजपची political game
त्या उलट भाजपने प्रत्येक प्रभागात किमान तीन उमेदवार बळकट ठेवून चौथ्या उमेदवाराला त्या तिघांचा सपोर्ट मिळेल, अशी व्यूहरचना आधीच करून ठेवली आहे. त्यांनी योग्य ते calculation करून वेगवेगळ्या पक्षांमधले सक्षम उमेदवार आधीच फोडून ठेवले आहेत. या political game मध्ये भाजप सगळ्यांचा “बाप” ठरला आहे. “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी फुगवून ठेवलेले “चाणक्य” एकीकडे आणि political game चा “बाप” दुसरीकडे अशी अवस्था प्रभाग रचनेने करून ठेवली आहे.
– पॅनेल पूर्ण करण्यासाठी काका – पुतण्यांची मजबुरीची युती
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची पुणे – पिंपरी चिंचवड मध्ये ही मजबुरी निर्माण झाली, की काही प्रभागांमध्ये सगळ्या सक्षम उमेदवारांचे पॅनल तरी देता यावे, यासाठी तरी आपण एकत्र आले पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आले. अन्यथा प्रत्येक प्रभागामध्ये फक्त एक – दोन बळकट उमेदवार देऊन भागणार नाही. महापालिकेतला अधिकृत विरोधी पक्ष होऊ शकेल, एवढे सुद्धा संख्याबळ निवडून आणता येणार नाही, हे पवार काका – पुतण्यांच्या लक्षात आले म्हणून मजबुरीने दोघांना एकत्र यावे लागले. त्यासाठी अजित पवारांना घड्याळाचा आग्रह सोडावा लागला, तर शरद पवारांच्या पक्षाला जास्त जागा मिळायचा आग्रह सोडावा लागला. पवार काका – पुतण्यांच्या एकत्र येण्यात उगाच सुप्रिया सुळे यांच्या केंद्रीय मंत्रिपदाचा बादरायणी संबंध जोडण्यात काही अर्थ नाही, हे यातून स्पष्ट झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App