युनिव्हर्सल पास असेल तरच लोकलचा पाससाठी परवानगी मिळणार; बोगस प्रमाणपत्रांना आळा

वृत्तसंस्था

मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण झाल्यानंतर मिळणारे पत्र (युनिव्हर्सल पास) दाखविल्याशिवाय उपनगरीय रेल्वेचा पास मिळणार नाही. कारण बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळात झाला आहे. त्याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. For local pass only if there is universal pass Will be allowed; Restrict illegal certificates

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह लसीकरण झालेल्या तसेच १८ वर्षांखालील मुलांना सरकारने काही दिवसांपूर्वी उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा दिली आहे.

त्याचप्रमाणे वैद्यकीय कारणामुळे कोणी लस घेऊ शकत नसेल तर डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावर रेल्वेपास देण्याची परवानगी सरकारने दिली आहे. परंतु, अत्यावश्यक सेवेतील बनावट ओळखपत्र, डॉक्टरांची प्रमाणपत्र दाखवून पास द्यावा, यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याच्या घटना घडत आहेत.

त्यामुळे बोगस ओळखपत्रांना लगाम घालण्यासाठी रेल्वे पास किंवा तिकिटासाठी आता केवळ राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दिला जाणारा युनिव्हर्सल पास हे एकमेव ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

For local pass only if there is universal pass Will be allowed; Restrict illegal certificates

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात