जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाला आधी प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा, आता मात्र सगेसोयरे मुद्द्यावर विरोध!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद तापला असताना सुरुवातीला मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता काही अंशी भूमिका बदलत सगेसोयरे या मुद्द्यावर जरांगे यांना विरोध केला आहे. मनोज हाके यांनी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेत काही अंशी बदल झाला आहे.First Prakash Ambedkar’s support for Jarange’s Maratha reservation movement, but now he opposes it on the Sagesoyre issue!!

मराठा नेते मनोज जरांगे हे मराठा समाजासाठी राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेश काढावा, या मागणीसाठी आग्रही आहेत. पण त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांकडून विरोध होतोय. विशेष म्हणजे ओबीसी नेत्यांपाठोपाठ आता प्रकाश आंबेडकरांनीदेखील सगेसोयरे अध्यादेशाला विरोध केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने मांडलेल्या 11 ठरावांपैकी पाचव्या ठराव्यात सगेसोयरे अध्यादेशाला रद्द करण्याची मागणी करण्याबाबतचा ठराव मांडण्यात आला आहे. त्यामुळे हा मनोज जरांगे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या बाबतच्या भूमिकेवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



“मायक्रोबेसीस आणि बारा बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग व्हावा ही मराठ्यांची सुद्धा मागणी आहे आणि तो केला पाहिजे. त्यामुळे त्यांना न्याय मिळेल. त्यांच्यावर ओबीसीमध्ये असलेला मोठा वर्ग अन्याय करतोय, त्यांना न्याय मिळत नाही. त्यांना असलेल्या आरक्षणाचा पण लाभ ते घेऊ देत नाहीत. त्यांचा वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे आणि त्यांना शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे. या भूमिकेशी मराठा शंभर टक्के सोबत आहेत”, असं मनोज जरांगे म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीने जीआर रद्द करण्याची काय मागणी केली ते मला माहिती नाही. मी ते वाचलंही नाही. त्यांनी जर तशी मागणी केली असेल तर त्यांना लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे. कोणाच्या मागणीला साथ द्यायची नाही किंवा द्यायची, याबद्दल आमचे काही दुमत नाही. पण सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी आम्ही मिळवणार आहोत, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाराज?

प्रकाश आंबेडकर यांनी जी मागणी केली त्यावर आम्ही नाराज होण्याचे काही कारण नाही. प्रकाश आंबेडकर यांना नेहमी आम्ही पाठिंबा दिला आणि त्यांनीही आम्हाला दिला आहे. आजही आमचे त्यांच्याबद्दल चांगले मत आहे आणि राहणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आमच्या मनात आजही आदराचे स्थान आहे. त्यांचे स्पष्ट बोलणे मला आवडते. प्रकाश आंबेडकर साहेब आमच्यासोबत असोत किंवा नसोत, आम्ही त्यांचा नेहमी सन्मान करतो आणि त्यांचे मराठ्यांच्या मनातील स्थान कायम राहणार आहे, अशी भावना मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.

पूर्वी ओबीसींचे मतदान एकगठ्ठा होते म्हणून राजकारणी त्यांना घाबरत होते. पण आता माझ्या मराठा समाजाचे मतदान एकगठ्ठा आहे. आता मराठे एका बाजूला आहेत. आता मराठा समाज निर्णायक आहे. कुणाला गुलाल पाहिजे असेल तर तो गोरगरीब मराठ्यांच्या हातात आहे. विजयाचा रथ गोरगरीब मराठ्यांच्या हातात आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

‘वंचित’चा नेमका ठराव काय?

“शासकिय यंत्रणेकडून मिळालेले जात प्रमाणपत्र हा एक महत्त्वपूर्ण अधिकृत दस्तावेज आहे. त्यामधे रक्ताच्या नातेवाईकांची (वडील, भाऊ, बहीण, काका, आत्या) जात प्रमाणपत्रे हा एक आवश्यक पुरावा असतो. या अतिशय महत्त्वपूर्ण मानलेल्या पुराव्याला बगल देण्याचे काम ‘सगेसोयरें’ (रक्ताचे नातेवाईक नसलेल्यांना) जातप्रमाणपत्र देण्याच्या अध्यादेशाद्वारे केलेले आहे. आरक्षण कायदा व नियमावली मधे चुकीची ढवळाढवळ करण्याची मनमानी सरकार करत आहे. अशा प्रकारे संविधानाची आरक्षण नीती आणि आरक्षणाच्या सामाजिक भूमिकेशी द्रोह करण्याचा अपराध सरकार आणि आरक्षण विरोधक करताहेत. त्यामुळेच समाजतील सामाजिक सौहार्द आणि बंधुभावाला तडे जात आहेत. जाती समुहात भांडणे लावण्याचे हे षडयंत्र आहे. वंचित बहुजन आघाडी सगसोयरेचा अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी या ठरावाद्वारे ही परिषद करीत आहे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे.

First Prakash Ambedkar’s support for Jarange’s Maratha reservation movement, but now he opposes it on the Sagesoyre issue!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात