विशेष प्रतिनिधी
चिमूर : वाघ पाहायला मिळणे भाग्य समजणाऱ्या पर्यटकांना येथील कर्मचाऱ्यांना काम करताना जीव कसा धोक्यात घालावा लागतो याचे प्रत्यक्ष दर्शन घडले. वाघ पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या समोरच एका वाघिणीने महिला वनरक्षकाचा बळी घेतला. माया नावाच्या वाघिणीने या महिलेवर हल्ला करून फरफटत जंगलात ओढत नेले.Female forest ranger killed in front of tourists, wandering in the forest
कोलारा वनपरिक्षेत्रात गेटपासून ४ किलोमीट अंतरावर ही थरारक घटना शनिवारी सकाळी ७ वाजता घडली. डोळ्यांसमोर घडलेल्या या प्रकाराने पर्यटक हादरून गेले होते. महिला वनरक्षक स्वाती ढुमणे तीन वनमजुरांसह वाघांचे चिन्ह सर्वेक्षण (ट्रॉन्झिट लाइन सर्व्हे) करीत होत्या. कक्ष क्रमांक ९७ मध्ये सुमारे २०० मीटरवर त्यांना माया वाघीण दिसली.
वाघिणीला बघून त्यांनी आपला मार्ग बदलला. मात्र, काही वेळातच अचानक वाघिणीने स्वाती यांच्यावर हल्ला चढविला व जंगलात फरपटत नेले. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून शोध घेतला असता, स्वाती यांचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर लगेच सर्व्हे थांबविण्यात आला,
अशी माहिती व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. वनविभागाच्या वतीने पती संदीप सोनकांबळे यांना पाच लाख दहा हजारांची तातडीची मदत देण्यात आली. त्यांना चार वर्षांची आरुषी नावाची मुलगी आहे.
वाघाचे सूक्ष्म चिन्ह घेण्याचे काम शुक्रवारपासून सुरू झाले. स्वाती यांनी दोन एटीएस कर्मचाऱ्यांची मागणी वनपालांना केली होती. ही मागणी मान्य झाली नाही. एटीएसचे प्रशिक्षित कर्मचारी सोबत असते तर ही घटना घडली नसती. या घटनेला वनाधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप स्वाती यांचे पती संदीप यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App