
विशेष प्रतिनिधी
पुणे : अख्खी राष्ट्रवादी गमावण्याची मनात भीती पण सुप्रिया सुळे दाखवत आहेत गडकरी फडणवीसांविषयी सहानुभूती, असे म्हणायची वेळ सुप्रिया सुळे यांच्याच वक्तव्यामुळे आली आहेFear of losing all nationalists; But Supriya Sule shows sympathy for Gadkari-Fadnavis!!
राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाची शरद पवारांची की अजित पवारांची??, याचा संघर्ष निवडणूक आयोगातल्या नियमित सुनावणीत होतो आहे. निवडणूक आयोगात शरद पवार गट अजित पवार गटावर वेगवेगळ्या आरोप करत आहे. अजित पवार गटही शरद पवार गटाला चोख प्रत्युत्तर देण्याच्या बेतात आहे.
एकीकडे पवार काका – पुतण्या मधला राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचा संघर्ष तीव्र होत असताना सुप्रिया सुळे यांना मात्र नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी सहानुभूती वाटत आहे. गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची शक्ती कमी करण्यासाठी दिल्लीतली अदृश्य शक्ती काम करत असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे यांचा पैतृक वारशाचा अख्खा पक्ष धोक्यात आहे, पण त्यांना भाजप मधल्या महाराष्ट्रातल्या दोन नेत्यांची “काळजी” लागली आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या :
मला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कायमच सहानुभूती वाटते. कारण दिल्लीतली अदृश्य शक्ती महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे काम करते आहे. फक्त महाराष्ट्रच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी असोत सगळ्यांना कमकुवत कसे करता येईल हे पाहिले जात आहे. मी हवेत हा आरोप करत नाही. याचे माझ्याकडे पुरावे आहेत. मी हे म्हणणे सिद्ध करु शकते. दिल्लीत बसलेल्या या अदृश्य शक्तीमुळे मराठी माणूस, महाराष्ट्रातला हिरे व्यापार, महाराष्ट्रातल्या नोकरीच्या संधी, एवढंच काय क्रिकेट सामनेही त्यांना कमकुवत करायचे आहेत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.
VIDEO | "Of course, I sympathise with Nitin Gadkari and Devendra Fadnavis always because I strongly believe that the 'invisible power' (Adrushya Shakti) of Delhi wants to destroy Maharashtra and I have data to prove it. They don't want Maharashtra to get anything. They want… pic.twitter.com/LcJCV2olkX
— Press Trust of India (@PTI_News) November 23, 2023
दिल्लीतल्या अदृश्य शक्ती असं म्हणत सुप्रिया सुळेंनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र कमकुवत करायचा हेच त्यांचे उद्दिष्ट आहे, असे त्या म्हणाल्या आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. आता सुप्रिया सुळेंनी जे वक्तव्य केलं आहे त्यावर भाजपाचे नेते काही बोलणार का??, याची प्रतीक्षा आहे.
Fear of losing all nationalists; But Supriya Sule shows sympathy for Gadkari-Fadnavis!!
महत्वाच्या बातम्या
- PNB Scam : नीरव मोदीला कोर्टाचा आणखी एक झटका, ७१ कोटींची मालमत्ता विक्रीचे आदेश
- महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रासाठी मोठी बातमी; वैद्यकीय शिक्षणाच्या श्रेणीवर्धनासाठी 500 दशलक्ष डॉलर्सची मदत!!
- जम्मूमध्ये घातपाचा मोठा कट उधळला ; ‘LOC’जवळ ड्रोनद्वारे फेकलेली शस्त्र सुरक्षा दलांनी केली जप्त!
- अयोध्या – काशी – मथुरा; श्रीकृष्ण जन्मभूमी दर्शन घेऊन पंतप्रधान मोदींनी वाजविला पुढच्या कामाचा डंका!!