विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला हजर राहणाऱ्या अखिल भारतीय इमाम परिषदेचे अध्यक्ष इमाम उमर अहमद इलियासी यांच्याविरुद्ध धमक्यांचा फतवा जारी करण्यात आला आहे. मात्र इमाम आपल्या मूळ भूमिकेवर ठाम आहेत.Fatwa issued against All India Imam Organization chief for attending Pran Pratishtha at Ram temple
इमाम उमर अहमद इलियासी श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला 22 जानेवारीला अयोध्येत हजर होते. तेथून त्यांनी सर्व धर्मीयांसाठी प्रेम आणि मोहब्बत असाच पैगाम दिला. जुने संघर्ष आणि वाद संपवावेत. नव्या भारतासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे त्यांनी संदेशात म्हटले होते.परंतु इमामांचा हा संदेश कट्टरवाद्यांना पचला आणि रुचला नाही. त्यामुळे त्यांनी इमामांविरुद्ध धमक्यांचा फतवा जारी केला आहे.
या फतव्यानंतर मला धमक्यांचे अनेक फोन कॉल आले. त्यापैकी मी काही कॉल्स रेकॉर्ड केले. त्याची माहिती पोलिसांना दिली आहे. पण मी धमक्यांना घाबरणार नाही. कारण मी प्रेम आणि मोहब्बत हाच संदेश दिला आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे त्यांना जे करायचे ते करू दे. मी माफी मागणार नाही. किंवा माझ्या मूळ भूमिकेपासून मागेही हटणार नाही, असे इमाम उमर अहमद इलियासी यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App