प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टॉप अजेंड्यावर असलेल्या मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनशी संबंधित भूसंपादन, मोबदला, जमीन हस्तांतर हे विषय 30 सप्टेंबर पूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर संबंधित विभागांनी काम करावे आणि प्रलंबित बाबी, आवश्यक परवानग्या तातडीने मिळवून घ्याव्यात असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. Fast decision of Chief Minister Eknath Shinde for bullet train
ठाकरे – पवार सरकारच्या काळात हा बुलेट ट्रेन प्रकल्प विविध कारणे दाखवून राजकीय दृष्ट्या अडकवून ठेवला होता बुलेट ट्रेनचे 80% काम गुजरात राज्याच्या हद्दीत येते. ते काम वेगात पूर्ण झाले आहे. उर्वरित 20 % काम महाराष्ट्राच्या हद्दीत येते. ते मात्र काम संथ गतीने सुरू होते. आता या कामातील सर्व अडथळे शिंदे – फडणवीस सरकारने दूर केले आहेत. भूसंपादन आणि मोबदला हा यातला महत्त्वाचा विषय होता तो सरकारने मार्गी लावला आहे.
असा आहे महत्त्वाकांक्षी प्रकल्प
मुंबई ते अहमदाबाद अशी 508.17 किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन असून यासाठी एक लाख 8000 कोटी खर्च आहे.
गुजरात आणि महाराष्ट्रात मिळून एकूण 12 स्थानके असून महाराष्ट्रात त्यातील 4 स्थानके आहेत. मुंबईतील 1 स्थानक वगळून उर्वरित तीनही स्थानके उन्नत प्रकारातील आहेत.
जपान सरकारने कर्ज दिले असून 50 % खर्चाचा वाटा केंद्र सरकार तर 25 % वाटा महाराष्ट्र आणि 25 % गुजरात सरकार उचलणार आहे.
एमएमआरडीए मधील 4.8 हेक्टर जागा भूमिगत स्थानकासाठी 30 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही एमएमआरडीएने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
भूसंपादन, मोबदला, जमीन हस्तांतर या बाबी व पालघर तसेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी देखील 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण कराव्यात असेही त्यांनी सांगितले.
मेट्रो मार्गासाठी भूसंपादन वेगाने करा!!
बैठकीमध्ये बुलेट ट्रेन व्यतिरिक्त मुंबई मेट्रो मार्ग-3,4,5,6,9 आणि 11 यांचा त्याचप्रमाणे मेट्रो मार्ग 2 ए (दहिसर पूर्व ते डीएन नगर), मेट्रो मार्ग-7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो मार्ग-4 तसेच ठाणे ते कल्याण व्हाया भिवंडी हा मेट्रो मार्ग-5 या मार्गांसाठी भूसंपादन व हस्तांतरणाचे काम वेगाने पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App