संपूर्ण पीक खरडून वाहून गेले आहे. तरीसुद्धा अजूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांना पीकविमा न मिळाल्याने, बीडमध्ये शेकडो शेतकरी आक्रमक झाले आहेत.Farmers in Beed district are aggressive for crop insurance; Huge proclamation in front of the Collector’s office
विशेष प्रतिनिधी
बीड : मागील दोन वर्षांपासून झालेल्या अतिवृष्टीने , बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले होते.तर यंदा संपूर्ण पीक खरडून वाहून गेले आहे. तरीसुद्धा अजूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांना पीकविमा न मिळाल्याने, बीडमध्ये शेकडो शेतकरी आक्रमक झाले आहेत.
त्यामुळे आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत प्रचंड घोषणाबाजी केली आहे.यावेळी पीकविमा मिळवा ही मागणी घेऊन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
तसेच शेतकऱ्यांनी आजही जिल्ह्यातील ४ लाख शेतकऱ्यांना मागील वर्षाचा पीकविमा मिळाला नाही.तर यंदा देखील ३० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही.त्यामुळे येणाऱ्या ७ दिवसात पीकविमा द्यावा. अन्यथा जिल्ह्यातील प्रत्येक गावात आंदोलन केले जाईल, असा इशारा वजा अल्टिमेटम शेतकऱ्यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App