फडणवीस सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात मदत मिळाली होती.या सरकारने केवळ आश्वासने दिली पण मदत तोडकीच दिली.Farmer leader Raju Shetty: Rs 950 assistance to Guntha during Fadnavis and Rs 135 given by the present government
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती गुंठा मिळालेली मदत सांगताना फडणवीस सरकार आणि ठाकरे सरकारमधील फरक स्पष्टपणे सांगितला आहे.राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या मदतीचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.त्यानुसार शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे मदत मिळालीच नसल्याचं माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी म्हणल आहे.तसेच पुढे शेट्टी म्हणाले की, फडणवीस सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात मदत मिळाली होती.या सरकारने केवळ आश्वासने दिली पण मदत तोडकीच दिली.
फडणवीस सरकार आणि ठाकरे सरकारने दिलेल्या मदतीतला फरक
नैसर्गिक आपत्तीच्या काळात फडणवीस सरकारने पीकविमा आणि निधीच्या स्वरूपात शेतकऱ्यांना चांगली मदत मिळाली होती. दरम्यान त्या तुलनेत सध्याच्या सरकारच्या बाबत तुमचं काय मत आहे. असा सवाल राजू शेट्टी यांना विचारण्यात आला.
यावेळी राजू यांनी उत्तर दिलं की २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी मीच केली होती.तो निर्णय योग्यच होता. देवेंद्र फडणवीस यांनी तो निर्णय घेतला होता म्हणून तो निर्णय चुकीचा होता अस मी म्हणणार नाही ,
२०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणेच मदत मिळेल.अस आश्वासन उध्दव ठाकरे यांनी दिलं होत.पण २ महिन्यांपूर्वी मी जो मुद्दा उपस्थित केला होता तसच घडलं.२०१९ च्या निर्णयानुसार त्यावेलेसच्या सरकरने प्रती गुंठयाला ९५० रुपये दिले होते. पण ठाकरे सरकरकडून १३५ रुपयाप्रमाणे पैसे ऊस उत्पादकांना मिळाले.
त्यामुळे जे बरोबर आहे त्याला मी बरोबरच म्हनणार आणि जे चुकीचं आहे त्याला चुकीचाच म्हणणार.राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणारी मदत तोकडी आहे. सरकारकडे पैसे नसल्याचं सरकार सांगत आहे.पण अशा परिस्थितीत सरकारने पैसा उभा करायचा असतो.अस देखील शेट्टी म्हणाले.
आज वसंत दादा पाटील यांची आठवण येते. कारण वसंत दादा असते तर त्यांनी शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊनच निर्णय घेतले असते,असे म्हणत राजू शेट्टींनी शेतकऱ्यांवरील सरकारी धोरणावर टीका केली. लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कित्येकांचे रोजगार बुडाले पण सरकारी नोकरदारांना ५ ते १० टक्के असणाऱ्या संपुर्ण पगार मिळाला.
घरी बसून सरकारी कर्मचाऱ्यांनी पगार घेतले,गेल्याच आठवड्यात त्यांना सरकारने महागाई भत्ताही दिला.वसंत दादा पाटील असते तर त्यांनी स्पष्टच सांगितलं असत. सरकारी नोकरदार तुम्ही घरीच बसून पगार घेतलाय. सरकार आता तुम्हाला ५० टक्के पगार देईल. पण आज ५० टक्के पागरवरच घर चालवा.महाराष्ट्रातील शेतकरी आज अडचणीत आहे , आपण त्याला मदत करूया अस वसंत दादा म्हणाले असते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App