प्रतिनिधी
मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आणि समीर वानखेडे प्रकरणात आरोप – प्रत्यारोपांच्या तोफा एकमेकांवर डागल्या जात असताना मोहित भारतीय यांनी एक नवीन फेसबुक पोस्ट लिहून नवा आरोप केला आहे फराज नवाब मलिक याने मोक्का कायद्या खाली अटक झालेला डॉन मोहम्मद अली शेख याच्याकडून २०११ मध्ये दोन फ्लॅट खरेदी केले. त्याची मार्केट व्हॅल्यू साडे अकरा करोड होती. प्रत्यक्षात त्याने साडेचार कोटीला ते फ्लॅट घेतले काय, असे सवाल मोहित भारतीय यांनी फेसबुक पोस्ट लिहून केले आहेत. Faraz Nawab Malik bought two flats from Don Mohammad Ali Sheikh ?; Mohit Bharatiya’s Facebook post
मोहम्मद अली शेख हा मुंबई डिझेल डॉन म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर मुंबईतील 26 /11 च्या हल्ल्याच्या वेळी देखील त्याचे नाव समोर आले होते. 2010 मध्ये एका हत्याप्रकरणात त्याला अटक देखील झाली होती. मोहम्मद अली शेख यांच्याकडून फ्लॅट घेण्याचा व्यवहार कसा काय केला? त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये होती त्या पक्षाने त्याला काही मदत केली आहे काय? असे सवाल मोहित भारतीय यांनी फेसबुक पोस्टमधून केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App