Wishwanath Garuds Marathi Poem : देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. औषधे, हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन इत्यादी जीवनावश्यक झालेल्या गोष्टींची प्रचंड ददात भासू लागली आहे. इकडे आड अन् तिकडे विहीर अशीच काहीशी ही परिस्थिती आहे. या सर्व परिस्थितीवर सुप्रसिद्ध डिजिटल मीडिया तज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार विश्वनाथ गरुड यांनी अंतर्मुख करायला लावणारी कविता केली आहे. Famous Writer Journalist Wishwanath Garuds Marathi Poem On Corona Crisis Oxygen deta ka Oxygen
विशेष प्रतिनिधी
पुणे : देशात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. औषधे, हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन इत्यादी जीवनावश्यक झालेल्या गोष्टींची प्रचंड ददात भासू लागली आहे. कोरोना महामारीने सर्वात जास्त ताण निर्माण झालाय तो आरोग्य यंत्रणेवर. प्रचंड संख्येने रुग्ण दाखल होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना दिवसरात्र एक करावा लागत आहे. अशातच कोरोना अटकाव घालण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. शासनाने नाही म्हणायला रोख मदत जाहीर केली, परंतु तीही अत्यंत तोकडी आहे. इकडे आड अन् तिकडे विहीर अशीच काहीशी ही परिस्थिती आहे. या सर्व परिस्थितीवर सुप्रसिद्ध डिजिटल मीडिया तज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार विश्वनाथ गरुड यांनी अंतर्मुख करायला लावणारी कविता केली आहे.
‘ऑक्सिजन देता का ऑक्सिजन!’ या शीर्षकाने विश्वनाथ गरुड यांनी ही कविता आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर प्रसिद्ध केली आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी सतत नवनवे आदेश काढणारे प्रशासन, फक्त बाता मारणारे सत्ताधारी इथपासून ते सर्वसामान्यांत दहशत निर्माण करणाऱ्या माध्यमांवरही आसूड उगारला आहे.
याच कवितेत त्यांनी कामाच्या ओझ्याने दबलेले वैद्यकीय कर्मचारी, नोकरी गमावलेले तरुण, हातावर पोट असणारे श्रमिक, रस्त्यावर उतरून लोकांना शिस्त लावणारे पोलीस यांच्या व्यथाही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वनाथ गरुड हे डिजिटल मीडिया तज्ज्ञ असून त्यांनी यावर दोन पुस्तकेही लिहिली आहेत. ‘डिजिटल पत्रकारिता’ आणि ‘डिजिटल बातम्या आणि एसईओ’ या दोन पुस्तकांद्वारे त्यांनी पत्रकारितेची डिजिटल वाट चाचपडणाऱ्या होतकरू तरुणांना मार्गदर्शन केले आहे. विश्वनाथ गरुड यांची ही कविता त्यांच्या फेसबुक वॉलवरून साभार…
ऑक्सिजन देता का ऑक्सिजन मरणासन्न झालेल्या व्यवस्थेला सतत नवे आदेश काढणाऱ्या प्रशासनाला टीव्हीवरच झळकणाऱ्या सत्ताधाऱ्यांना ऑक्सिजन देता का ऑक्सिजन? रुग्णांना क्षणाक्षणाला वाहून नेणाऱ्या ॲम्ब्युलन्स चालकांना थकलेल्या डॉक्टर्संना, नर्सेसना आणि फ्रंटलाईन वर्कर्संना स्मशानभूमीत दिवसरात्र राबणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना ऑक्सिजन देता का ऑक्सिजन!!! वाचाळ बडबड करणाऱ्या विरोधकांना अक्राळ-विक्राळ भीती निर्माण करणाऱ्या माध्यमांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अगाध ज्ञान देणाऱ्यांना ऑक्सिजन देता का ऑक्सिजन? लॉकडाऊनमुळे नोकरी गमावलेल्यांना घरी राहून संसार उदध्वस्त झालेल्यांना हातावरलं पोट असलेल्या श्रमिकांना प्रॉफीट गमावेल्या व्यापाऱ्यांना ऑक्सिजन देता का ऑक्सिजन!!! अज्ञात शत्रूविरुद्ध युद्ध लढणाऱ्या पोलिसांना घरदार विसरून मदतीसाठी पुढे आलेल्या सेवकांना ग्राऊंडवर पुन्हा जाण्यासाठी आसुसलेल्या निष्पापांना ऑक्सिजन देता का ऑक्सिजन!!! आप्पे पात्रातील पाव, कढईतले केक आणि दालगोना कॉफी करणाऱ्यांना लॉकडाऊनमध्ये कसकसले ऑनलाईन क्रॅश कोर्स सुरू करणाऱ्यांना सोशल मीडियावर लाईव्ह येऊन फुकटचे सल्ले देणाऱ्यांना ऑक्सिजन देता का ऑक्सिजन हे ही दिवस सरतील या आशेवर बसलेल्यांना पुन्हा मित्र-मैत्रिणींना कडकडीत मिठी मारता येईल असं वाटणाऱ्यांना हॉटेलमध्ये निवांत बसून कट्ट्याची स्वप्न रंगवणाऱ्यांना आणि ‘जग कोरोनामुक्त’ अशी बातमी वाचण्यासाठी अधीर झालेल्यांना… ऑक्सिजन द्यायलाच हवा हो ऑक्सिजन!!!!!! – विश्वनाथ गरुड, पुणे.
मरणासन्न झालेल्या व्यवस्थेला सतत नवे आदेश काढणाऱ्या प्रशासनाला टीव्हीवरच झळकणाऱ्या सत्ताधाऱ्यांना ऑक्सिजन देता का ऑक्सिजन?
रुग्णांना क्षणाक्षणाला वाहून नेणाऱ्या ॲम्ब्युलन्स चालकांना थकलेल्या डॉक्टर्संना, नर्सेसना आणि फ्रंटलाईन वर्कर्संना स्मशानभूमीत दिवसरात्र राबणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना ऑक्सिजन देता का ऑक्सिजन!!!
वाचाळ बडबड करणाऱ्या विरोधकांना अक्राळ-विक्राळ भीती निर्माण करणाऱ्या माध्यमांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अगाध ज्ञान देणाऱ्यांना ऑक्सिजन देता का ऑक्सिजन?
लॉकडाऊनमुळे नोकरी गमावलेल्यांना घरी राहून संसार उदध्वस्त झालेल्यांना हातावरलं पोट असलेल्या श्रमिकांना प्रॉफीट गमावेल्या व्यापाऱ्यांना ऑक्सिजन देता का ऑक्सिजन!!!
अज्ञात शत्रूविरुद्ध युद्ध लढणाऱ्या पोलिसांना घरदार विसरून मदतीसाठी पुढे आलेल्या सेवकांना ग्राऊंडवर पुन्हा जाण्यासाठी आसुसलेल्या निष्पापांना ऑक्सिजन देता का ऑक्सिजन!!!
आप्पे पात्रातील पाव, कढईतले केक आणि दालगोना कॉफी करणाऱ्यांना लॉकडाऊनमध्ये कसकसले ऑनलाईन क्रॅश कोर्स सुरू करणाऱ्यांना सोशल मीडियावर लाईव्ह येऊन फुकटचे सल्ले देणाऱ्यांना ऑक्सिजन देता का ऑक्सिजन
हे ही दिवस सरतील या आशेवर बसलेल्यांना पुन्हा मित्र-मैत्रिणींना कडकडीत मिठी मारता येईल असं वाटणाऱ्यांना हॉटेलमध्ये निवांत बसून कट्ट्याची स्वप्न रंगवणाऱ्यांना आणि ‘जग कोरोनामुक्त’ अशी बातमी वाचण्यासाठी अधीर झालेल्यांना… ऑक्सिजन द्यायलाच हवा हो ऑक्सिजन!!!!!!
– विश्वनाथ गरुड, पुणे.
Famous Writer Journalist Wishwanath Garuds Marathi Poem On Corona Crisis Oxygen deta ka Oxygen
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App