विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांबरोबरची आपली “पॉलिटिकल केमिस्ट्री” बाजूला ठेवून प्रथमच पुण्यातल्या जाहीर सभेत त्यांच्यावर “भटकती आत्मा” म्हणून जबरदस्त प्रहार केला होता. त्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ उठल्यानंतर अनेकांनी मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अजित पवारांनी तर मोदी नेमके कुणाला भटकती आत्मा म्हणालेत हे मी त्यांना पुढच्या सभेत भेटल्यावर विचारेन, असा टोला हाणला. Fadnavis taunted that they only oppose the opposition.
पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यापुढे जाऊन पवारांना चिमटा काढला. झी 24 तास ला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातल्या जाहीर भाषणात फक्त टोपी फेकली, ती ज्यांना डोक्यावर घ्यायची होती, त्यांनी ती घेतली. त्यांच्या डोक्यावर ती फिट बसली!!
झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी अनेक गौप्यस्फोट देखील केले. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यापासून बाजूला होऊन भाजप बरोबर येत असताना स्वतः उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि त्यांनी थेट मलाच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. सगळा पक्ष घेऊन येण्याची तयारी दाखवली. पण आता वेळ निघून गेली आहे. तुम्ही दिल्लीत आमच्या पक्षश्रेष्ठींशी बोला, असे सांगून उद्धव ठाकरेंची ऑफर नाकारली, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भटकती आत्मा या टीकेवर प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस म्हणाले, मोदीजींनी तर कोणाचंच नाव घेतलं नव्हतं. त्यांनी टोपी फेकली. ज्यांना ती आपल्या डोक्यावर घ्यायची होती, त्यांनी ती घेतली. मोदींजींनी फक्त इतकीच वस्तुस्थिती सांगितली की, महाराष्ट्रात असे काही लोकं आहेत, की ज्यांना जनतेने सत्तेबाहेर काढल्यानंतर येणाऱ्या सत्तेला अस्थिर कसं करता येईल, याचा प्रयत्न करतात आणि “हम ना खेले, तो खेल बिगाडे” अशा मानसिकतेतेतून काम करतात. म्हणूनच महाराष्ट्रात एकटा देवेंद्र फडणवीस सोडला तर वसंतराव नाईकांनंतर कोणीही 5 वर्षे पूर्ण करुच शकले नाही. त्यामुळं मोदीजींनी एक तथ्य सांगितले.. आता काही लोकांनी ते जिव्हारी लावून घेतले. मोदींनी टोपी फेकली. ज्यांना वाटलं त्यांनी ती डोक्यावर घेतली!!
महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सध्याच्या विरोधकांना “कन्स्ट्रक्टिव्ह अपोझिशन” बनताच आले नाही. ते “डिस्कक्ट्रिक्टिव्ह अपोझिशन” बनले. त्यांना विरोधी पक्षात गेल्यानंतर विरोध करायचा असतो, पण समाजहित, देशहित या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन विरोध करायचा असतो. हे त्यांच्या लक्षात येत नाही. ते फक्त विरोधाला विरोध करतात, असा टोला फडणवीसांनी हाणला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App