प्रतिनिधी
अमरावती : भारताच्या अध्यक्षतेखाली अत्यंत यशस्वी झालेल्या g20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर सनातन हिंदू धर्माचा अपमान करण्याचे स्पर्धा “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांमध्ये आणि लिबरल जमातीमध्ये लागली असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले आणि त्यांनी अमरावतीतून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टालिन यांना जबरदस्त आव्हान दिले. भारतावर आक्रमण करणारे संपले,पण भारत तसाच राहिला आहे. कोणाच्या बापाची हिंमत आहे हिंदू धर्म संपवण्याची!!, असे जळजळीत उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. Fadnavis lashed out at Udayanidhi Stalin
अमरावतीत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात फडणवीस बोलत होते
फडणवीस म्हणाले : या देशावर ज्यांनी आक्रमण केले, ते संपले. पण हिंदू धर्म कधी संपला नाही. कुणाच्या बापाची हिंमत आहे, जो हिंदू धर्म नष्ट करू शकेल. द्रमूकचे नेते उदयनिधी स्टॅलिन जर हिंदू धर्म संपविण्याची भाषा बोलत असतील, तर त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल.
हिंदू धर्माला डेंग्यू, मलेरिया म्हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनचे वडील एम. के. स्टॅलिन यांच्या बाजूला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसतात. ते आता कुणाच्या सोबत आहेत, हे लोकांना कळले आहे. त्यांना आता नक्कीच घरी पाठवावे लागेल.
भगवान श्रीकृष्ण हे तर अमरावती जिल्ह्याचे जावई आहेत. त्यांच्या जन्मोत्सवात आम्ही विकासाचा, प्रेमाचा काला घेऊन आलो आहोत. गेल्या सत्तर वर्षांत जितका निधी अमरावती जिल्ह्याला मिळाला नाही, तेवढा निधी आमच्या सत्ताकाळात मिळाला.
अमरावतीतील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ विकास, मेगा टेक्सटाईल पार्क, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात क्रीडा विद्यापीठ, रिद्धपुरात मराठी भाषा विद्यापीठ, रस्त्यांची 2 हजार कोटी रुपयांची कामे हा विकासाचा ओघ आला.
काही लोकांनी हनुमान चालिसा म्हणणायासाठी नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकले. पण त्यांना काही लाभ झाला नाही. परंतू या देशात केवळ भगवान राम चालतील, हनुमानजी चालतील अन् छत्रपती शिवाजी महाराज चालतील. भारत माता की जय असा जयघोष चांगला वाटतो की भारत माता म्हणण्यास किती चांगले वाटते. इंडिया माता म्हणणं मनाला चांगल वाटतं का??
हिंदू धर्मियांचा अपमान करणाऱ्यांना फडणवीसांनी “बाप” काढून उत्तर दिल्याने विरोधी आघाडीत खळबळ माजली आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App