विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या डॅमेजला कंट्रोल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात परतले आहेत, पण भाजपच्या टॉप बॉसेसचा संपूर्ण पाठिंबा घेऊनच. डॅमेज कंट्रोलसाठी काही करेक्शन्स करावी लागतील, ती करण्यासाठी भाजपच्या टॉप बॉसेसने फडणवीसांना पाठिंबा दिला आहे.Fadnavis in Maharashtra for damage control; Full support of BJP top bosses for political corrections!!
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झालेल्या हाराकिरीने महायुतीला धक्का बसला. घटक पक्षात ही कुरबुरी सुरु झालेल्या आहेत, तर या अपयशाची जबाबदारी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा पुढे केला. ते राजीनामा देण्यावर ठाम होते. पण दिल्लीत झालेल्या बैठकीत अखेर त्यांचे मन वळविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले. त्यांचा राजीनामा नाकारण्यात आला असला तरी, एक मोठी जबाबदारी फडणवीस यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली.
भाजपला तर फायदाच नाही
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याशी युती करुन कोणताही लाभ झाला नाही, हा मुद्दा समोर आला. महायुती करुनही भाजपच्या पदरात काहीच पडले नाही. या दोन्ही पक्षांच्या मतदारांनी भाजपला नाकारल्याचा दावा करण्यात आला. उलट भाजपमुळे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना फायदा झाल्याचा बैठकीत सूर आळवण्यात आला.
महायुतीचा फायदा की तोटा?
महाराष्ट्रात तीन वर्षांपासून सत्तेत असूनही भाजप आणि महायुतीला लोकसभेत कामगिरी बजावता आली नाही. महाविकास आघाडीने मोठी आघाडी घेतली. आता चार महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. राज्यातील सर्वात मोठा गड विदर्भातील हारकिरी पक्षाला झोंबली आहे. हा गड मजबूत करण्यात येणार आहे. तर इतर क्षेत्रातील हक्काचे मतदार संघ गेल्याने तिथे डॅमेज कंट्रोल करण्यात येणार आहे. यासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महायुतीबाबत मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. महायुतीचा पुनर्विचार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता महायुतीतून कोणाला बाहेरचा रस्ता दाखविला जातो की जागा वाटाघाटीत भाजप मुस्काटदाबी करते हे लवकरच समोर येईल.
#WATCH | Maharashtra BJP president Chandrashekhar Bawankule says, "Yesterday's meeting was a party meeting and we discussed the results in the Lok Sabha election results…We also discussed how the union & state government's policies can reach people. It was not a political… pic.twitter.com/lv9n7sgNwj — ANI (@ANI) June 19, 2024
#WATCH | Maharashtra BJP president Chandrashekhar Bawankule says, "Yesterday's meeting was a party meeting and we discussed the results in the Lok Sabha election results…We also discussed how the union & state government's policies can reach people. It was not a political… pic.twitter.com/lv9n7sgNwj
— ANI (@ANI) June 19, 2024
फडणवीस लागले कामाला
दिल्ली दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. दिल्लीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा न देता प्रशासनामध्ये राहूनच पक्ष संघटना मजबूत करावी अशा आशयाची चर्चा झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत परतताच आज नागपूर मधल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची आढावा बैठक बोलावली. देवेंद्र फडणवीस यांनी मला सरकार मधून मोकळ करावं अशी भूमिका मांडली होती. मात्र भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी त्यांच्या भूमिकेला नकार दिला. तो निर्णय मान्य करत देवेंद्र फडणवीस पुन्हा कामाला लागले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App