CM Fadnavis : घरवापसीनंतर मुलीच्या अपत्यांना हिंदू कायदा लागू व्हावा, यासाठी बदल करू; नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

CM Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CM Fadnavis लव्ह जिहाद प्रकरणे रोखण्यासाठी महाराष्ट्रात कायदा आहेच, मात्र अशा प्रकरणांमध्ये घरवापसी केलेल्या मुलींच्या अपत्यांना यापुढे हिंदू कायदा लागू होईल, वारसा हक्क कायद्यात त्यासाठी बदल करण्याच्या दिशेने शासन कार्यरत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे रविवारी अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेत दिली.CM Fadnavis

नाशिक येथे ४ व ५ एप्रिल २०२६ रोजी आयोजित अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील सुमारे ३०० संत सहभागी झाले असून त्यास रविवारी फडणवीस यांनी संबाेधित केले. सनातन धर्म जपणे व पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आधीच अस्तित्वात आहे.CM Fadnavis



मुस्लिम तरुणाशी विवाह केल्यानंतर जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्यास अशा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. त्यामुळेे अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी शासनाकडे ठाेस कारण असेल. त्यानंतरही घरवापसी झालेल्या व पुन्हा हिंदू धर्मात आलेल्या मुलींच्या अपत्यांना आईचाच धर्म लागू व्हावा, यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

धर्मरक्षण करणाऱ्याला व्यक्तींना शस्त्र परवाना देण्यात येणार का? या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्याची सुरक्षा व्यवस्था सक्षम असून महाराष्ट्र पोलिस रक्षण करण्यासाठी समर्थ आहेत.

Hindu Law for ‘Ghar Wapsi’ Children: CM Fadnavis Proposes Legal Shift in Nashik

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात