विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : CM Devendra Fadnavis बारामती आणि राहुरी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच आमची इच्छा आहे, त्यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा. पण जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.CM Devendra Fadnavis
दुसरीकडे मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या गाडीवरील लाल-निळ्या दिव्यांच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी त्यांची पाठराखण केली. गाडीवर लाल दिवा नव्हता, तर बोनेटच्या ठिकाणी तो लावलेला होता. यात महापौरांचा कोणताही दोष नाही. नियम सर्वांना माहित आहेत, पण त्यांना विनाकारण टार्गेट करणे चुकीचे आहे, असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.CM Devendra Fadnavis
अजून बरेच काम करायचे बाकी
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39 व्या पदवीदान समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद पदवी) प्रदान करण्यात आली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जेव्हा मला या पदवीबाबत विचारणा झाली, तेव्हा मनात संभ्रम होता. कारण कृषी क्षेत्रात अजून बरेच काम करायचे बाकी आहे. मात्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठासारख्या नामांकित संस्थेचा आदर राखण्यासाठी मी ही पदवी स्वीकारली.
14 हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट
राज्यातील कृषी स्थितीवर बोलताना फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार’ आणि ‘सोलर योजना’ यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. या वर्षाअखेरपर्यंत 14 हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असून, शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तसेच, हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी 10 हजार गावांमध्ये ‘क्लायमेट प्रूफ’ शेती सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App