दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. त्यानुसार अखेर फडणवीसांनी आज बॉम्ब फोडलाय. मुंबईत 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय.
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांवर खळबळजनक आरोप केले आहेत. नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
कुर्ल्यातील प्राईम लोकेशनची जमिनीची कवडीच्या दरात खरेदी. FADANVIS PRESS: Finally, Fadnavis detonated a bomb! Why did Malik buy land from Mumbai bombers? Excitement by the press of Fadnavis
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.माय मराठीची क्षमा मागून आजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात राष्ट्रभाषेत करणार आहोत. मी एक घोषणा केली होती दिवाळीनंतर काही गोष्टी समोर आणणार आहे. उशीर झाला, काही लोकांच्या पत्रकार परिषद सुरु होत्या. मी जे सांगणार आहे ती सलीम जावेद यांची कथा नाही. तो इंटरवल नंतरचा चित्रपट नाही. हा एक देशाच्या सुरक्षेबद्दलचा प्रश्न आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांवर खळबळजनक आरोप केले आहेत. नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
सरदार शहाबली खान हा 1993 चे गुन्हेगार आहेत. त्यांना जन्मठेप झाली आहे ते तुरुंगात आहेत. त्यांची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम केली आहे. सरदार शहाबली खान याच्यावर टायगर मेमन याच्या नेतृत्त्वात मुंबई महापालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सेंजमध्ये बॉम्ब ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली होती. टायगर मेमनच्या घरी बैठक झाली होती. टायगर मेमनच्या गाडीत आरडीएक्स भरलं गेलं त्यामध्ये सरदार शहाबली खानचा समावेश होता. सरकारी साक्षीदारांनतर त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे.
सलीम पटेल हे व्यक्ती आहेत. आर.आर.पाटील एका इफ्तार पार्टीत गेले होते. त्यामध्ये आर.आर. पाटील यांचा दोष नव्हता. सलीम पटेल याच्यासोबत फोटो चालवला गेला होता. सलीम पटेल हा हसीना पारकरचा ड्रायव्हर होता. 2007 मध्ये हसीना पारकरला अटक झाल्यानंतर सलीम पटेलला अटक करण्यात आली होती. दाऊद फरार झाल्यानंतर हसीना पारकरच्या नावावर संपत्ती जमा करण्यात येत होती. सलीम पटेलच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी करण्यात येत होती, असा दावा फडणवीस यांनी केला.
कुर्ला येथे तीन एक जमीन 1 लाख 23 स्क्वेअर फुट जमीन होती. ही जमीन एलबीएस रोडवर आहे. ही जमीन आहे याची एक नोंदणी सॉलिडस नावाच्या कंपनी सोबत झाली आहे. या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम खान याच्या नावावर आहे. विक्री सरदार शहा वली याच्या नावावर आहे. सॉलिडस कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. या कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची आहे. सॉलिडसमध्ये 2019 मध्ये नवाब मलिक देखील होते. त्यांनी राजीनामा दिला. फराज मलिक यांनी ही जमीन खरेदी केली. मलिक यांचे कुटुंबीय सॉलिडसमध्ये आहेत. याच ठिकाणच्या फोनिक्स मार्केटच्या जमिनीची खरेदी झाली 2053 रुपये स्वे. फीटने झाली. आणि अंडरवल्डच्या लोकांकडून घेतलेली जमीन 3 एकर खरेदी झाली 30 लाखात, त्यातील 20 लाखांचंच पेमेंट झालं. यातील सलीम पटेलला 15 लाख मिळाले आणि 10 लाख शाह वली खान म्हणजेच सरदार खानला मिळाले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
20 लाखात एलबीएस रोडवर 3 एकर जमीन खरेदी झाली. पॉवर ऑफ अर्टनीमध्ये टेनंट वेगळा, रजिस्ट्रीवेळी वेगळा, किंमत कमी दाखवण्यासाठी हे केलं गेलं. याची किंमत 3.50 कोटी दाखवली. रजिस्ट्री कमी दाखवण्यासाठी हे केलं गेलं. रेडी रेकनर 8500 रु. स्वे.मीटर मार्केट रेट 2 स्वेअर फीट, खरेदी झाली 25 रुपये स्वे.फूटने आणि स्टँप ड्युटी भरली 15 रुपये स्वेअर फूटने, असा दावा फडणवीस यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App