विशेष प्रतिनिधी
जळगाव : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये, अशी टीका त्यांनी केली होती. Face-to-face: Ram Satpute answers Eknath Khadse’s criticism; Rohini Khadse took the news of Satpute
एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, नाथाभाऊ आपण आयुष्भर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केले नाही आणि देवेंद्रभाऊबदल बोलत आहात. विरोधी पक्षनेते असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेन्द्रजीवर बोलण्याअगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल.
त्यांना एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अधक्षा अॅड. रोहिणी खडसे यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे.’एकनाथ खडसे हे जर पैसे खात होते, तर ज्या वेळी तुमची सत्ता होती, तेव्हा कारवाई का केली नाही. तुम्ही काय तेव्हा नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? असा सवाल अॅड. रोहिणी खडसे यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते यांना विचारला आहे.
नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात.विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार.निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल .@EknathGKhadse @Rohini_khadse @Dev_Fadnavis https://t.co/ZneiBNtHCQ — Ram Satpute (Modi Ka Parivar) (@RamVSatpute) April 18, 2021
नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात.विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार.निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल .@EknathGKhadse @Rohini_khadse @Dev_Fadnavis https://t.co/ZneiBNtHCQ
— Ram Satpute (Modi Ka Parivar) (@RamVSatpute) April 18, 2021
त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, खडसे जर पैसे खात होते, तर मग सत्ता होती, तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिम्मत तर सिद्ध करा ना? श्यामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली? ज्यांच्याबद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का? अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी राम सातपुते यांचा समाचार घेतला आहे.
अहो @RamVSatputeजर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही?तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?आणी असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना ? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोँबली?ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का? — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) April 18, 2021
अहो @RamVSatputeजर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही?तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?आणी असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना ? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोँबली?ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का?
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) April 18, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App