एकनाथ खडसे अडचणीत, अंजली दमानियांनी ईडीला दिली भोसरीतील जमीन व्यवहाराची माहिती

माजी मंत्री आणि भाजपातून नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. त्यांच्या भोसरीतील जमीन व्यवहाराची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) दिली आहे. Eknath Khadse in trouble, Anjali Damania informed the ED about the land transaction in Bhosari


विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी मंत्री आणि भाजपातून नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. त्यांच्या भोसरीतील जमीन व्यवहाराची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सक्तवसुली अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) दिली आहे.

मला ईडीचा समन्स आला होता, म्हणून मी आले होते. ईडीने मला माहिती विचारली ती मी दिली आहे. मला जर पुन्हा ईडीतर्फे बोलावलं गेलं, तर मला यावचं लागणार आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या चौकशीपूर्वी ईडीकडून माहिती गोळा केली जात आहे. ईडीकडून अंजली दमानिया यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले.भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांना क्लिन चिट दिली होती. त्याला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आव्हान दिले होते. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांच्याविरोधातील अंजली दमानिया यांच्यातर्फे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दाखल केलेला त्रयस्थ अर्जदाराचा हस्तक्षेप अर्ज न्यायालयाने मंजूर केला होता. मे 2018 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे यांना भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात दिलासा दिला होता.

एकनाथ खडसेंवर आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला होता. एसीबीने या प्रकरणाचा अंतिम अहवाल कोर्टात सादर केला होता. जमीन खरेदी प्रकरणात खडसेंमुळे सरकारचे नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाला नाही, असा उल्लेख अहवालात करण्यात आला होता. मात्र, अंजली दमानिया यांनी पुणे सेशन कोर्टात अर्ज केला होता. दमानिया यांनी सु्प्रीम कोर्टातील निकालाचा दाखला देत त्याला आव्हान दिले होते. खडसे यांनी पदाचा गैरवापर करत जमीन पत्नी आणि जावयाच्या नावे विकत घेतल्याचा आरोप आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार एका दिवसांत झाला असून, याबाबतचे पुरावे दिल्याचे वकिलांनी कोर्टात सांगितले.

Eknath Khadse in trouble, Anjali Damania informed the ED about the land transaction in Bhosari

अंजली दमानिया म्हणाल्या की, मला कुठल्याही राजकारणात पडायचं नाही. माझी जी कोर्टात याचिका होती त्यासंदर्भात मला ईडीने काही माहिती विचारली. ती माहिती मी ईडीला दिली आहे. यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी अंजली दमानिया यांनी आपल्याकडे एकनाथ खडसे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा दावाही केला होता. तत्पूर्वी अंजली दमानिया यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषेदवर नियुक्ती करु नये, यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रही लिहले होते. खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना वापरलेली भाषा या सर्व गोष्टींमुळे त्यांना आमदार करु नये, असे दमानिया यांनी पत्रात म्हटले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*