विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवरून पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांच्या जोरदार ट्विटर वॉर सुरू झाले आहे. सुरूवातीला बीडमध्ये कमी प्रमाणात मिळालेल्या लशीचा मुद्दा पुढे करून पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. प्रितम मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करून टोला लगावला. धनंजय मुंडे यांनीही मग एकामागोमाग सहा ट्विट करून मुंडे भगिनींना प्रत्युत्तर दिले. Face-to-face: Pritam-Dhananjay-Pankaja attack each other from Beed
पंकजा मुंडे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून बीडमध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. तसंच लस देखील पुरेसी मिळाली नसल्याचं पत्रात म्हटलं.
राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीडलाही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत,” असं ट्वीट करत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. यावर धनंजय मुंडेनी देखील ट्विट करत उत्तरं दिली.
#REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीड ला ही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत. pic.twitter.com/30Bi8lu7mj — Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 15, 2021
#REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीड ला ही पुरेसे #vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत. pic.twitter.com/30Bi8lu7mj
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 15, 2021
धनंजय मुंडे यांनीही सलग सहा ट्वीट करत पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडेवर टीका केली. “ताई साहेब, मुख्यमंत्र्यांना व आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल!” असं ट्वीट धनंजय मुंडेंनी केलं.
अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल. @DrPritamMunde pic.twitter.com/9EjHxh1Rqp — Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 16, 2021
अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल. @DrPritamMunde pic.twitter.com/9EjHxh1Rqp
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 16, 2021
अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या २ लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत. त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या. हे काहींना ज्ञात नसेल,” अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.
धनंजय मुंडे यांच्या सहा ट्विटनंतर पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा ट्विट केलं. “राज्याच्या भल्यासाठी PM, जिल्ह्याच्या CM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल! तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा, विकास निधी, अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!” असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
राज्याच्या भल्यासाठीPM,जिल्ह्याच्याCM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल!तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा.तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही.विमा,विकास निधी,अनुदान काही नाही,माफिया मात्र आणले.जुन्या निधीचे काम तरी करा,उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ! pic.twitter.com/H6dgMPaFFL — Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 16, 2021
राज्याच्या भल्यासाठीPM,जिल्ह्याच्याCM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल!तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा.तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही.विमा,विकास निधी,अनुदान काही नाही,माफिया मात्र आणले.जुन्या निधीचे काम तरी करा,उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ! pic.twitter.com/H6dgMPaFFL
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 16, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App