RTE प्रवेशासाठी २९ एप्रिल पर्यंत मुदतवाढ निवासी पुरावा म्हणून भाडेकरार ग्राह्य

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार २०२२ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत येथे काढण्यात आली आहे. ४ एप्रिलल पोर्टलवर निवड यादी व प्रतिक्षा यादी घोषित करण्यात आली आहे. Extension till April 29 for RTE admission Lease agreement valid as proof of residence

आरटीई २५ टक्के अंर्तगत आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून यासाठी प्रवेश अर्जाच्या मुदतीत २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासोबतच आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश घेताना निवसी पुरवा म्हणून अकरा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरार ग्राह्य धरला जाणार आहे.



९०,६८८ विद्यार्थ्यांची निवड यादी तर ६९,८५९ विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी आरटीई पोर्टलवर जाहीर करण्यात आली आहे. तसेच २०० दिव्यांग विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. निवड यादीतील व प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना SMS पाठविण्यात आलेले आहेत.

राज्यातील आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी २० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता मुदतवाढ मिळण्याबाबत काही जिल्हयांनी तसेच काही पालकांनी, संस्थांनी व लोकप्रतिनिधींनी संचालनालयास विनंती केली आहे. पालकांना होणारी अडचण संचलनालयाच्या लक्षात आले.

यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन त्यांची प्रवेशाची संधी त्यांना मिळावी जाऊ यासाठी आरटीई प्रवेशासाठी २९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राथमिक संचलनालयाकडून सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक याना शाळांना या सूचना निर्देश देण्यात आले आहेत.

Extension till April 29 for RTE admission Lease agreement valid as proof of residence

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात