विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिवाजी युनिव्हर्सिटीने यावर्षीची परीक्षा फी न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्व कोर्सेससाठी लागू होणार आहे. जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. दरवर्षी युनिव्हर्सिटीकडून एक्झाम फीमध्ये 5 टक्क्यांनी वाढ केली जाते. पण सध्या कोरोनाची वाईट स्थिती त्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक ताणतणावाची स्थिति लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
Exam fees will not increase this year! Decision of Shivaji University
चीफ कंट्रोलर ऑफ एक्झाम गजानन पानसे यांनी सांगितले, मागील दोन वर्षांपासून सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठीदेखील एक्झाम फीमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. जवळपास 300 ते 1500 इतकी एक्झाम फी असते. आणि ही फी कोणत्या कोर्ससाठी तुम्ही परीक्षा देता त्यावर डिपेंड करते. लवकरच आगामी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. परीक्षा फी न वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला असणार.
महाराष्ट्रातही स्थापन होणार कौशल्य विद्यापीठ, राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मिळाली मान्यता
एक्झाम ही फी ही प्रामुख्याने स्टेशनरी सामान, ऑनलाईन/ऑफलाईन ज्या पध्दतीने परीक्षा घेतली जाते त्यासाठी आणि रिझल्टचे कामासाठी ही एक्झाम फी युनिव्हर्सिटी कडून आकारली जाते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App