विनायक ढेरे
गणेशाच्या आगमनापूर्वीच पुण्याच्या ऐतिहासिक मिरवणुकी संदर्भातला विसर्जनाचा वाद मुंबई हायकोर्टात पोहोचला आहे. पुण्यातील ऐतिहासिक बढाई समाज गणेशोत्सव मंडळाने हायकोर्टात मानाच्या पाच गणपतीच्या मिरवणुकी विरोधात याचिका दाखल केली आहे. लक्ष्मी रस्त्यावरून मानाच्या पाच गणपतींनाच सर्वप्रथम पुढे जाऊ दिले जाते हा समतेच्या कायद्याचा भंग असल्याचा दावा याचिकेत मंडळाने केला आहे. मानाची मंडळे मिरवणुकीला भरपूर वेळ लावतात त्यामुळे बाकीच्या मंडळांच्या मिरवणुकीला विलंब होतो आणि पोलीसही छोट्या मंडळांवर खटले दाखल करतात, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. एडवोकेट असीम सरोदे हे मंडळाची बाजू हायकोर्टात लढवत आहेत. मानाच्या पाचही गणपतीच्या गणपती मंडळांना यामध्ये प्रतिवादी केले आहे. Even before the arrival of Ganesha, the dispute of immersion reached the High Court
– लोकमान्यांनी घालून दिलेला क्रम
पण सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासासारखाच विसर्जन मिरवणुकीचाही विशेष इतिहास आहे आणि त्यात वाद अजिबात नवीन नाही. विसर्जन मिरवणुकीचा वाद फक्त 2022 मध्येच कोर्टात पोहोचला असे नाही, तर वेगवेगळ्या वर्षांमध्ये अनेक वाद विसर्जन मिरवणुकी संदर्भात रंगले होते. स्वतः लोकमान्य टिळक हयात असताना विसर्जन मिरवणुकीचा जो वाद झाला होता त्या वादावर लोकमान्यांनी पुण्यातल्या त्या वेळच्या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या सल्लामसलतीनुसार विसर्जन मिरवणुकीचा क्रम घालून दिला होता.
यामध्ये पुण्याचे ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीचा मान प्रथम ठेवून त्यानंतर ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी नंतर सरदार खाजगीवाले यांचा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम त्यानंतर तुळशीबाग आणि त्यानंतर आपला केसरी वाडा अशा मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीची रचना लोकमान्यांनी घालून दिली होती. गेली 130 वर्षे अव्यहातपणे पुण्याच्या सार्वजनिक गणपतीच्या मुख्य मिरवणुकीचा क्रम आहे. अर्थात मिरवणुकीचा क्रम ही सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा बनली आहे हा कोणताही कायदा नाही अथवा कायदेभंग देखील नाही.
मात्र, पुण्यातल्या मिरवणुकीतल्या क्रमावर कायद्याच्या मुद्द्यावर बढाई मंडळाने आव्हान दिले आहे. हायकोर्टात यासंदर्भात कोणता युक्तिवाद केला जातो?? आणि त्यावर हायकोर्ट काय निर्णय देते??, याकडे मानाच्या गणपती मंडळांसह सर्व गणेश भक्तांचेही लक्ष लागून राहिले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App