प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारमधील माजी मंत्री आणि काॅंग्रसचे नेते अस्लम शेख यांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मढमधील स्टुडिओ घोटाळा प्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे. याप्रकरणी मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण विभागाने दिले आहेत. Environment department notice to Aslam Sheikh in Madh Marve Studio 1000 crore scam case
असलम शेख यांनी काही दिवसांपूर्वीच मोहित कंपोज बरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, ती याच संदर्भात असल्याची चर्चा होती. परंतु, आता नोटीस आल्यानंतर फडणवीस भेट व्यर्थ गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले की, अस्लम शेख- मढ मार्वे येथे 1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळा. महाराष्टाच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगितले. मला स्टुडिओ तोडण्याची कारवाईची अपेक्षा आहे.
अस्लम शेख यांचा 1000 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. त्यापैकी 300 कोटींची कागदपत्रे आहेत. अस्लम शेख यांनी समुद्रात स्टुडिओ उभारला आहे, असे पाच स्टुडिओ आहेत. ज्यात CRZ नियमांचे उल्लंघन केले आहे. गोपाळ शेट्टी यांच्यासोबत मी पाहणी केली, कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवली आहे. आदित्य ठाकरे यांनी पण इथे भेट दिली होती.
किरीट सोमय्यांचे आरोप काय?
अस्लम शेख यांचा एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे. त्यापैकी 300 कोटींची कागदपत्रे आहेत. अस्लम शेख यांनी समुद्रात स्टुडिओ उभारला आहे, असे पाच स्टुडिओ आहेत. ज्यात CRZ नियमांचे उल्लंघन केले आहे. गोपाळ शेट्टी यांच्यासोबत मी पाहणी केली, कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवली आहे. आदित्य ठाकरे यांनी पण इथे भेट दिली होती. ज्या जागेवर 2019 साली काही नव्हते तिथे 2021 ला स्टुडिओ उभारला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App