वृत्तसंस्था
मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक व्हावी म्हणून पोलिसांना दम देणारे ठाकरे – पवार सरकारमधील परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निकटवर्ती अनिल परब यांना मनी लाँड्रींग प्रकरणी सक्तवसूली संचलनालयाने ED नोटीस पाठविली आहे. त्यांना ३१ ऑगस्टला चौकशीसाठी मुंबई कार्यालयात हजर राहण्याचे आदेश काढले आहेत.Enforcement Directorate (ED) summons Maharashtra Minister Anil Parab in connection with a money laundering case.
यावर अनिल परब असल्या नोटिशींना घाबरत नसून ते कायदेशीर कारवाईला सामोरे जातील, असे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र, असे ट्विट संजय राऊतांनी केले आहे. असे असले, तरी त्यांच्या पूर्वी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीच तो इशारा देऊन ठेवला होता. त्यामुळे संजय राऊतांच्या ट्विटमधली हवा निघाली आहे.
शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊतांनी आज सायंकाळी ट्विट केले आहे. पण त्या पूर्वीच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा इशारा दिला होता. ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
१०० कोटींहून अधिक कोटींची अफरातफतर आहे. अनेक बोगस कंपन्या, कोलकातामधून पैसा आला, वाझे वसुली गँगचा हिस्सा असो किंवा २०१०, २०१२ चा पैसा असो…अनिल देशमुख यांना त्याचा हिशेब द्यावा लागणार. आता पुढे अनिल परब यांचाही नंबर लागणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी त्या ट्विटमधील व्हिडिओमध्ये म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App