राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस.enforcement directorate ed issued notice to minister anil parab shivsena leader sanjay raut given information by tweet
विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे
नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची आज सांगता झाली. यात्रेनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली असल्याची माहिती दिली. तसेच केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
‘शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. chronology कृपया समज लिजिये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू… जय महाराष्ट्र’, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App