वृत्तसंस्था
मुंबई : नोव्हेंबर 2006 मध्ये रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभय्याच्या बनावट एन्काउंटर प्रकरणात 21 आरोपींना सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. सत्र न्यायालयाने यात 13 पोलिसांना दोषी ठरवले होते, पण एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जामिनावर सोडण्याचा निर्णय घेतला होता.Encounter specialist Pradeep Sharma sentenced to life imprisonment by HC, ordered to surrender within three weeks
उच्च न्यायालयात सुनावणीनंतर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी शर्मालाही दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याला तीन आठवड्यांत न्यायालयापुढे आत्मसर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.
11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबईतील वर्सोव्याच्या नाना-नानी पार्कजवळ रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारात डीएननगर आणि जुहू पोलिसांची गँगस्टर छोटा राजनचा सहकारी लखनभय्यासोबत चकमक झाली होती. यात त्याचा मृत्यू झाला. मात्र, हे एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला. पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या चौकशीतही ते उघड झाले. या प्रकरणात पोलिस प्रशासनातील 13 अधिकाऱ्यांना अटक झाली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App