प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीने राजभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या उद्योग समूह, कौशल्य क्षेत्रीय परिषद आणि रोजगार प्रदाते यांच्यासोबत आज 44 सामंजस्य करार करण्यात आले असून त्याद्वारे महाराष्ट्रातील1.21 लाख युवकांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. Employment for 1.21 lakh youth in Maharashtra
राज्यपाल भगतसिंग कोशियारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, यांच्या उपस्थितीत राजभवनात परिसंवादही आयोजित करण्यात आला होता.
राज्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून ४४ सामंजस्य करार करण्यात आले असून, त्या माध्यमातून राज्यात १ लाख २१ हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नुसते सामंजस्य करार करण्यावर न थांबता या आस्थापनांसोबत त्याचा पाठपुरावा देखील करण्यात येणार आहे. काहीही करून फक्त नोकरी करणारे नव्हे, तर नोकरी देणारे हात निर्माण करण्याचा प्रयत्न देखील शासनाकडून करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील कौशल्य विकास विभाग या सगळ्यांना एकत्रित आणून हा कार्यक्रम करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ही फक्त सुरुवात असून यापुढेही जास्तीत जास्त रोजगार जत्रा भरवणे, ग्रामीण भागात १ हजार नवीन कौशल्य विकास केंद्रे सुरू करून त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.
याप्रसंगी राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत काही आस्थापनांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आणि रोजगार विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी हे देखील यावेळी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App